World Smile Day : अरेच्चा ! हसण्याचे आहेत 'इतके' प्रकार ..

हसणं आरोग्याला फायदेशीर असते , पहा कोणकोणत्या आजारांपासून मिळेल सुटका

जागतिक हास्य दिन Photo Credits : Pixabay

अनुवांशिकतेने अनेक गोष्टी मिळत असल्या तरीही दोन स्माईल्स कधीच एक सारख्या असू शकत नाहीत. प्रत्येकाच्या स्माईलमध्ये काही विशेष असतं. 5 ऑक्टोबर हा दिवस जागतिक स्माईल दिवस म्हणून साजरा केला जातो. मग पहा केवळ एका स्माईल मागे किती गोष्टी दडलेल्या असतात.   World Smile Day : या सेलिब्रेटींच्या हास्याने जिंकली प्रेक्षकांची मने !

एन्डॉरफिन रीलिज होते -

हसणं आरोग्यदायी असतं असं म्हटलं जातं. कारण जेव्हा आपल्या चेहर्‍यावर हास्य येतं तेव्हा एन्डॉरफिन हार्मोन्सचा स्त्राव होतो. हे हार्मोन्समुळे मूड सुधारतो.

रक्तदाब कमी -

एन्डॉरफिन हार्मोन्समुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. प्रामुख्याने उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी हा उत्तम नैसर्गिक उपाय आहे.

19 प्रकारच्या स्माईल्स -

journal Psychological Reportsने दिलेल्या माहितीनुसार स्माईल्स या 19 विविध प्रकारच्या असू शकतात. साधं हास्य ते अगदी खदखदून हसण्यापर्यंत वेगवेगळे असू शकतात.

चेहर्‍याचा व्यायाम -  

हसणं हा चेहर्‍याच्या व्यायामापैकी एक आहे. केवळ एका स्माईलमुळे चेहर्‍यावरील 26 स्नायूंचा व्यायाम होतो. त्यामुळे चेहर्‍याच्या जॉ लाईनपासून चेहर्‍याच्या स्नायूंना मजबूत करण्यासाठी मदत होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement