World NoTobacco Day 2019: तंबाखू खाण्याने होतो 'COPD' हा गंभीर आजार, जाणून घ्या ह्याची कारणे आणि दुष्परिणाम
तंबाखू खाण्याने होतो 'सीओपीडी' हा गंभीर आजार, जाणून घ्या ह्याची कारणे आणि दुष्परिणाम
तंबाखू (Tobacco) सारख्या घातक पदार्थावर सरकारने बंदी आणलेली असूनही अजूनही ह्या तंबाखूचे व्यसनापासून लोक मुक्त झालेली नाही. काहींच्या आयुष्यात तर हा अविभाज्य घटकच बनला आहे. मात्र ह्या तंबाखूमुळे होणारे आजारांची भीषणता जर आपल्याला कळली तर त्याने एखाद्याचे आयुष्यही संपू शकते ही गोष्टच मुळी लोकांना पटत नाही. तंबाखूच्या सेवनाने 'सीओपीडी' (COPD) यासारखा एक गंभीर आजार आता डोकं वर काढू लागलाय. म्हणून हा आजार होऊ नये म्हणून आज 'जागतिक तंबाखू विरोधी दिना' (World NoTobacco Day) निमित्त हा आजार म्हणजे नेमका आहे तरी काय, तसेच त्याची कारणे आणि दुष्परिणाम ह्या विषयी सविस्तरपणे माहिती देणार आहोत.
COPD म्हणजे नेमका काय आणि ह्याची कारणे:
सीओपीडी म्हणजे काय?
अति तंबाखूच्या सेवनाने हा आजार होतो. क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) हा वाढत जाणारा आणि फुफ्फुस अशक्त करत जाणारा आजार आहे. याचा अर्थ हा की, हा आजार कालांतराने गंभीर स्वरुप धारण करतो.
सीओपीडी ची कारणे:
1. तंबाखूचा धूर हे सीओपीडीचे मुख्य कारण आहे. यात सिगरेट, सिगार आणि पाईपमधून येणारा धूर तसेच सेकंड हँड स्मोकटा समावेश आहे. एखादी व्यक्ती सिगरेट ओढत असताना त्या व्यक्तीच्या आजुबाजूला असलेल्या व्यक्ती सेकंड हँड स्मोकिंग करत असतात.
2.तसेच रासायनिक कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार, चुलीवर काम करणा-या महिला यांना देखील दूषित धुरामुळे सीओपीडी होऊ शकतो.
3. एखादी व्यक्ती 20 वर्षे रोज 20 सिगरेच होत असेल तर त्याला सीओपीडी होऊ शकतो.
सीओपीडी ची लक्षणे:
1.चालताना दम लागणे
2. या आजारामुळे खोकला येतो, छातीत घरघर होते आणि धाप लागते.
3. सीओपीडीसाठी अनेक घटक कारणीभूत असतात. त्यात हवेतील प्रदूषण आणि धुळ कारणीभूत असते.
4.श्वसनास त्रास होणे
5. श्वसननलिकेला सूज येणे, श्वास अडकणे
6. ह्रद्यविकार, फुफ्फसाचा कर्करोग, श्वसनयंत्रणा निकामी होण्याचा धोका असतो.
काय काळजी घ्यावी:
1. सीओेपीडी मुळे न्यूमोनिया होऊ शकते. ऑक्सिजन थेरपीची गरज भासू शकते. म्हणून धुम्रपान करणा-या व्यक्तींना पल्मोनरी रिहॅबिलिटेशन करण्याचा सल्ला दिला जातो.
2. यात व्यायाम, आरोग्य प्रशिक्षण आणि श्वसनाच्या तंत्रांचा समावेश असतो.
3. तंबाखू सोडण्यासाठी सामाजिक-भावनिक सहकार्याचीही आवश्यकता असते.
4.स्मोकर्स कफचा अनुभव येत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
5. सीओडीपी असलेल्या रुग्णाने धुम्रपान सोडविण्याच्या थेरपीसाठी नोंदणी करुन घ्यावे.
6. औषधांसोबतच समुपदेशन, बिहेव्हिअर थेरपी, औषधे, निकोटिन पॅचेस, गम, इन्हेलर्स, नोझल स्प्रे इत्यादी निकोटिनमुक्त उत्पादनांचा वापर धुम्रपान सोडविण्यासाठी केला जाऊ शकतो.
7. फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेवर लक्ष ठेवणे, संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी लस घेणे, योगासने व श्वासाचे व्यायाम करणे
तंबाखूची जाहिरात न करण्याचा अजय देवगण याला चाहत्याचा सल्ला
थोडक्यात सांगायचे झाले तर , 'prevention is better than cure' प्रतिबंध करणे हे उपचारांपेक्षा कधीही चांगले हा सल्ला येथे बहुमोल आहे. म्हणजेच सीओपीडीवर उपचार करण्यासाठी धुम्रपान व्यसन सोडणे हा सर्वात परिणामकारक उपचार आहे.