World Heart Day: हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आरोग्यदाई खुराक
म्हणूनच शरीराचं मुख्यालय निर्धोक ठेवायचं असेल तर, तुम्हाला पुढील आहाराकडं मुळीच दुर्लक्ष करुन चालणार नाही.
खरं म्हणजे शरीराचे सर्वच अवयव महत्त्वाचे. त्यामुळं एखाद्य अवयावाचं कौतुक करायचं तर, ते इतर अवयवांवर अन्यायकारक ठरेल. असे असले तरी, सर्वसाधारणपणे हृदयाला शरीराचं मुख्यालय मानलं जातं. शरीराला आवश्यक असलेली रक्ताची रसद पुरवणं हे त्याचं प्रमुख काम. त्यामुळं ज्याचं हृदय तंदुरुस्त, त्याचं आरोग्यही तंदुरुस्त. म्हणूनच शरीराचं मुख्यालय निर्धोक ठेवायचं असेल तर, तुम्हाला पुढील आहाराकडं मुळीच दुर्लक्ष करुन चालणार नाही.
टोमॅटो - हृदयाचा हेल्दी जोडीदार
टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचा घटक असतो. जो हृदयाला हेल्दी ठेवण्यास मदत करतो. अनेक संशोधनांमधून पुढे आले आहे की, लायकोपीन हे शरीरातील नको असलेल्या कोलेस्ट्रॉलची मात्रा घटवते. कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाला स्ट्रोकचा खतरा असतो. म्हणून आहारात टोमॅटोचा वापर करा. टोमॅटो तुम्ही सलाड म्हणूनही घेऊ शकता.
आलं - बहोत काम की चीज है ये
सर्वसाधारणपणे कुठेही उपलब्ध असलेलं आलं हृदयासाठी फार फायदेशीर असते. यात जिंजेरॉल्सचे तत्व असते. जिंजेरॉल्स शरीरातील कोलेस्ट्रॉलला बाहेर हाकलते. नियमीतपणे डाएटमध्ये आल्याचा वापर केल्यास रक्तदाब (ब्लड प्रेशर) आणि धमन्यांच्या संबंधीत रोगांचा धोका कमी होतो. जेवनातील भाजी किंवा चहामधून तुम्ही आले घेऊ शकता.
अळशी - आकारावर जाऊ नका, गुणधर्म पाहा
अळशीमध्ये अल्फालिनोलिक अॅसीड असते. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी हा घटक महत्त्वाचा ठरतो. याशिवाय यात शरीरातील कोलेस्ट्रॉलला बाहेर काढण्याचीही शक्ती असते. त्यामुळे आहारात अळसीचा वापर जरुर करा.
राजमा - खाऊन तर पाहा..
फॉलेट आणि अॅन्टीऑक्सीडेंट्स हार्ट प्रॉब्लेमला दूर ठेवण्यासाठी राजमा फायदेशीर. यात असलेले कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आणि फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर घटवतात. फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉलला साचण्यापासून वाचवते.
ग्रीन टी - नियमित घ्या, नियमित प्या
ग्रीन टीमध्ये असलेले कॅटेचीन सारखे अँटीऑक्सीडेंट्स हृदयरोगापासून बचाव करण्यास फायदेशीर असते. शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करण्यासाठी ग्रीन टी केव्हाही फायदेशीर.