World Cancer Day: धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले; Air Pollution असू शकते कारण- Lancet Report
एडेनोकार्सिनोमा नावाचा फुफ्फुसाचा कर्करोग धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त आढळतो. संशोधनातून असेही दिसून आले की, 2022 मध्ये, जगभरातील फुफ्फुसाच्या कर्करोगाची 53-70 टक्के प्रकरणे अशा लोकांमध्ये आढळली ज्यांनी कधीही धूम्रपान केले नव्हते.
जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी, संपूर्ण जगभरात कर्करोगाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल (UICC) या आंतरराष्ट्रीय संस्थेने 2000 साली या दिवसाची सुरुवात केली. आता कर्करोगाबद्दल एक नवीन संशोधन समोर आले आहे. तर, धूम्रपान करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो, परंतु आता लॅन्सेटच्या अहवालानुसार धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही या आजाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामागे वायू प्रदूषण हे एक प्रमुख कारण असू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, धूम्रपान न करताही फुफ्फुसांच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि याचे एक प्रमुख कारण वायू प्रदूषण असू शकते. हे संशोधन इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या शास्त्रज्ञांनी केले आहे.
यामध्ये, ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरी 2022 मधील डेटाचे विश्लेषण करण्यात आले, ज्यामध्ये असे आढळून आले की, एडेनोकार्सिनोमा नावाचा फुफ्फुसाचा कर्करोग धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त आढळतो. संशोधनातून असेही दिसून आले की, 2022 मध्ये, जगभरातील फुफ्फुसाच्या कर्करोगाची 53-70 टक्के प्रकरणे अशा लोकांमध्ये आढळली ज्यांनी कधीही धूम्रपान केले नव्हते. अहवालानुसार, सिगारेट न ओढल्यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, कारण वायू प्रदूषण हे देखील फुफ्फुसाच्या कर्करोगाचे एक प्रमुख कारण ठरत आहे.
जाणून घ्या काय आहे एडेनोकार्सिनोमा-
एडेनोकार्सिनोमा हा फुफ्फुसांच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे, जो शरीरात श्लेष्मा निर्माण करणाऱ्या ग्रंथींवर परिणाम करतो. महिलांमध्ये या प्रकारच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो. हा कर्करोग धूम्रपानाशी संबंधित नाही. या फुफ्फुसाच्या कर्करोगाचे कारण वायू प्रदूषण आहे. प्रदूषित हवा, विशेषतः PM2.5 सारख्या लहान कणांची उपस्थिती आणि इतर हानिकारक वायू फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. धूम्रपान न करणाऱ्यांनाही या प्रदूषणाच्या संपर्कात येण्याचा त्रास होऊ शकतो. (हेही वाचा: New Cancer Treatment: आता Flash Radiotherapy द्वारे कॅन्सरवर काही मिनिटांत उपचार होण्याची शक्यता; जाणून घ्या सुरक्षित आणि जलद ट्रीटमेंटसाठी कशी उपयुक्त आहे)
असे करू शकता स्वतःचे रक्षण-
तज्ज्ञांच्या मते, फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये वाढ रोखण्यासाठी, लोकांना वायू प्रदूषण, हानिकारक रसायने आणि कार्सिनोजेन्स टाळण्याची आवश्यकता आहे. याशिवाय, नियमित वैद्यकीय तपासणी आणि योग्य आहाराचे पालन केल्याने देखील फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. आयएआरसीचे मुख्य शास्त्रज्ञ फ्रेडी ब्रे म्हणाले की, आज फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या वाढत्या घटनांमागे बदलत्या धूम्रपानाच्या सवयी आणि वायू प्रदूषण हे दोन मुख्य घटक आहेत. हे टाळण्यासाठी सरकारांना तंबाखू नियंत्रण आणि वायू प्रदूषण नियंत्रण धोरणे लागू करावी लागतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)