हिवाळ्यात सनस्क्रिन लावणे का महत्वाचे? जाणून घ्या कारण

तर हिवाळ्यात तुम्ही सनक्रिन लावू नये असा विचार करत असल्यास ते चुकीचे आहे. कारण हिवाळ्यात सुर्याची किरणे फार अधिक असून ते त्वचेला नुकसान करु शकतात.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Instagram)

हिवाळ्याचे दिवस सुरु होणार असल्याचे आरोग्यासंबंधित अधिक काळजी यावेळी घेतली जाते. तर हिवाळ्यात तुम्ही सनक्रिन लावू नये असा विचार करत असल्यास ते चुकीचे आहे. कारण हिवाळ्यात सुर्याची किरणे फार अधिक असून ते त्वचेला नुकसान करु शकतात. या स्थितीत त्वचेची काळजी घेणारे सनस्क्रिन लावणे गरजेचे आहे. सनस्क्रिनची गरज सर्वात जास्त हिवाळ्यात असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. कारण या काळात त्वचा कोरडी झाल्याचे दिसून येते.

उन्हाळ्याच्या दरम्यान UVB किरण येत असल्याने ती त्वचेसाठी धोकादायक असतात. मात्र हिवाळ्यात UVB पेक्षा UVA किरणे अधिक पडतात. त्यामुळे त्वचेवर सनबर्न, सुरकुत्या आणि काळे डाग पडल्याचे दिसतात. त्यामुळे हिवाळ्यात 30 एपीएफ सनस्क्रिन क्रिम लावणे जरुरीचे आहे. थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी होत असल्याने प्रत्येक 3 तासानंतर सनस्क्रिन लावणे आवश्यक आहे. हिवाळ्यात ओझोन वायूचा पट्टा कमी होत असल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर परिणाम होतो. खरंतर त्वचेच्या सुरक्षिततेसाठी सनस्क्रिन क्रिम नेहमीच लावणे आत्यवश्यक आहे.

बाजारात SPF 7 ते SPF 70 पर्यंचे सनस्क्रिन लोशन उपलब्ध आहेत. मात्र एक्सपर्टकडून असे सांगितले जाते की, वातावरणानुसार SPF 20-30 च्या क्रिमचा वापर करावा. कारण जास्त SPF असलेल्या क्रिमचा वापर केल्यास त्वचेसाठी हानिकारक ठरु शकते. हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीचे प्रोडक्ट वापरल्याने त्वचा अधिक मऊ होण्यास मदत करते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif