WHO ने दिला Pandemic Fatigue बाबत सतर्क राहण्याचा इशारा; कोरोना संकटामुळे चिडचिड, अनुत्साही वाटणं या मानसिक आरोग्यावर परिणाम करणार्या समस्यांशी कसा कराल सामना?
कोविड 19 मुळे सहाजिकच अनेक गोष्टींबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. सातत्याने वाईट, नकारात्मक माहिती, बातम्या समोर येत आहेत त्यामुळे सहाजिकच मानसिक आरोग्यावर परिणाम होऊन Pandemic Fatigue चा त्रास जाणवत आहे.
जगभरात मागील सहा महिन्यांपासून कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. 36,065,782 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 1,054,947 जणांचा बळी गेला आहे. हळूहळू कोविड 19 या आजाराबाबत जनसामान्यांमध्ये जागृती पसरत असली तरीही या आजाराचा सामान्यांच्या आयुष्यात शारिरीक आणि मानसिक परिणामही गंभीर आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या गोष्टीची दखल घेत त्याबाबत सजग राहण्याचा इशारा दिला आहे. कोविड 19 शी मागील 6 महिने झुंजणार्या जगात आता Pandemic Fatigue दिसायला लागले आहे. युरोपामध्ये प्रामुख्याने त्याची भीषणता जाणवायला सुरूवात झाली आहे. एका सर्व्हेनुसार, युरोपामध्ये Pandemic Fatigue चे प्रमाण 60% जवळ आहे.
कोविड 19 मुळे सहाजिकच अनेक गोष्टींबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. सातत्याने वाईट, नकारात्मक माहिती, बातम्या समोर येत आहेत त्यामुळे सहाजिकच मानसिक आरोग्यावर परिणाम होऊन Pandemic Fatigue चा त्रास जाणवत आहे. COVID-19 Sore Throat: घसा खवखवणं सामान्य आहे की, कोरोना विषाणूच्या संसर्गाच लक्षण? जाणून घ्या अशा परिस्थितीत काय करावं.
Pandemic Fatigue ची लक्षणं
नकारात्मक गोष्टींचा सामना करत स्वतःला मजबूत ठेवण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून तुमची शक्ती वापरली जात आहे. एका विशिष्ट टप्प्यानंतर तुम्हांला त्याचा मानसिक ताण येणं स्वाभाविक आहे. यामधूनच Pandemic Fatigue निर्माण होत आहे त्यामुळे तुम्हांला हा त्रास होत असेल तर या लक्षणांमधून त्याचे संकेत मिळू शकतात.
भीती वाटणं, नकारात्मक विचार मनात येनं, अस्वस्थ वाटणं, चिडचिड होणं, आवडीच्या गोष्टी करण्यापासूनही मन उडणं, एकटं वाटणं, निराश वाटणं, उत्साह नसणं ही लक्षणं Pandemic Fatigue चे संकेत देतात. यासोबतच तुमच्या जीवनशैलीत बदल झाले असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. यामध्ये भूक, झोप कमी होणं, एकाग्रता कमी करणं, नवीन गोष्टी सुचणं बंद होणं, नर्व्हस होणं यांचा समावेश असू शकतो. आत्महत्येचा विचार, नैराश्य यामधून आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलण्याआधी एकदा या Suicide Prevention Helplines वर संपर्क करा.
Pandemic Fatigue वर मात कशी कराल?
- स्वतःची काळजी घेणं
स्वतःची काळजी घेणं ही सगळ्यात कठीण पण तितकीच महत्त्वाची बाब आहे. यामध्ये नियमित पोषक आहार, 6-7 तासांची शांत झोप यासोबत व्यायाम करणं आवशयक आहे. यामुळे शारिरिक स्वास्थ्य सुधारतं, रोगप्रतिकारक्षमता सुधारेल. परिणामी तुमच्यामध्ये उर्जा टिकून राहील.
- ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करा
कळत-नकळत अनेक गोष्टींचा आपल्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर ताण असतो. तो कमी करण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा. यामध्ये योगा, ध्यान साधना करा. पॉझिटिव्ह गोष्टी ऐका, वाचा. हलक्या फुलक्या गोष्टी पहा.
- संवाद ठेवा
सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे नियम असल्याने अनेकांना भेटणं शक्य नसले तरीही फोन वर, सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात रहा. संवादामुळे जर तुमच्यामध्ये एकटेपणाची भावना असेल ती कमी होऊ शकते तसेच तुमच्या परिवारात, मित्र-मैत्रिणींपैकी कुणी त्या फेजमधून जात असेल तर त्यांच्यावरील ताण कमी होण्यास मदत होईल.
- भावनांना ओळखायला शिका
प्रत्येक गोष्टींचा आपल्यावर चांगला-वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे त्यामधून निर्माण होणार्या भावनांकडे दुर्लक्ष करून किंवा मनात साचून ठेवून प्रश्न सुटणार नाही हे लक्षात ठेवा. उलट तुमच्या भावनांना ओळखून त्यांचा कसा कुठे निचरा होईल हे पहा.
- पॉझिटिव्ह सेल्फ टॉक
तुमच्या स्वतःशिवाय तुम्हांला दुसरं कुणीच उत्तम ओळखू शकत नाही त्यामुळे सध्याचा काळ कठीण असला तरीही ही एक फेज आहे आणि ती जाणार आहे यावर विश्वास ठेवा. सध्या तुमच्याकडून काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे होत नसल्या तरीही हळूहळू त्यामध्ये कसे सुधार होऊ शकतात याकडे लक्ष द्या. स्वतःच्या महत्वाच्या, प्राधान्याच्या गोष्टी निवडा आणि त्या पूर्ण करण्यासाठी दिवसभराचे छोटे छोटे प्लॅन्स बनवून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यासाठी स्वतःला प्रोत्साहन द्या.
Pandemic Fatigue चा त्रास हा प्रामुख्याने तरूण मंडळींना अधिक भेडसावत आहे. कोरोनाचा प्रभाव जगभरात आजच्या घडीलाही जगात कायम आहे. त्यामुळे त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्या स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. अद्यापही कोरोना व्हायरसवर ठोस उपचार, लस उपलब्ध नसल्याने नियमित हात धुणं, सोशल डिस्टंसिंग पाळणं आणि मास्कचा वापर करणं आवशयक आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)