Female Genital Mutation: खतना केल्याचा महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम, आतापर्यंत 1.4 अब्ज डॉरल खर्च, WHO चा धक्कादायक अहवाल
याच अहवालात असेही म्हटले आहे की, प्रतिवर्षी 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक महिला आणि मुलींना खतानामुळे उद्भवणाऱ्या आजाराला सामोरे जावे लागते.
जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization) म्हणजेच डब्लूएचओ (WHO) जगभरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत नेहमीच जागृत असते. म्हणूनच या संस्थेकडून विविध आजार, विषय आदींवर नेहमीच वेगवेगळे अहवाल प्रसिद्ध केले जातात. ज्यातील आकडेवारी जगभरात प्रमाण मानली जाते. WHO ने नुकताच फीमेल जेनिटल म्यूटिलेशन (Female Genital Mutation) याबबत एक अहवाल प्रसिद्ध केला. महिलांच्या जननेंद्रीयाचा केलेला खतना (Circumcision ) या विषयावर अहवालात नोंदवलेली आकडेवारी आणि निष्कर्ष दोन्ही प्रचंड धक्कादायक असून, त्याची वेळीच दखल घेतली नाही तर, जगभरातील अनेक महिलांच्या जीवनावर त्याचा वाईट परिणाम पाहायला मिळू शकतो.
खतना केल्यामुळे महिलांना उद्भवणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी जगाच्या अर्थव्यवस्थेवर तब्बल 14 अब्ज डॉलर इतका बोजा पडत असतो. याच अहवालात असेही म्हटले आहे की, प्रतिवर्षी 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक महिला आणि मुलींना खतानामुळे उद्भवणाऱ्या आजाराला सामोरे जावे लागते. साधारणपणे मुलीच्या वयाच्या 15 व्या वर्षी खतना केला जातो. या प्रक्रियेचा तिच्या आयुष्यावर प्रचंड मोठा परिणाम होतो. यात आजारांचे संक्रमण, रस्तस्त्राव, मानसिक धक्का यांसह अनेक गोष्टींचा समावेश आहे. खतना केल्यामुळे असाध्य अशा शारीरिक आजारांनाही महिलांना सामोरे जावे लागते. ज्याचा सामना या स्त्रियांना आयुष्यभर करावा लागू शकतो असेही या अहवालात म्हटले आहे.
डब्लूएचओच्या अहवालानुसार, जगभरातील अनेक देश आपल्या आरोग्यविषयक खर्चातील सुमारे 10 टक्के निधी हा फीमेल जेनिटल म्यूटिलेशन च्या उपचारांवर खर्च करतात. मध्य अशिया आणि अफ्रीकेतील काही देशांमध्ये हाच आकडा सुमारे 30 टक्के इतका आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या महिला, प्रजनन आरोग्य आणि संशोधन विभागाचे निदेशक इयान आस्क्यू यांनी म्हटले आहे की, FGM हा केवळ मानवाधिकारांचेच उल्लंघन नव्हे तर, महिला आणि मुलींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचेही खच्चीकरण आहे. या प्रथेमुळे देशातील आर्थिक स्वास्थह्यी बिघडत असल्याचे या संघटनेचे म्हणने आहे.
यूनिसेफने म्हटल्यानुसार, इजिप्तने 2008 मध्ये FGM (खतना) पद्धतीवर बंदी घातली आहे. परंतू, सुदान देशासारख्या काही ठिकाणी अद्यापही ही पद्धत सुरु आहे. संयुक्त राष्ट्र बाल निधी (United Nations Children's Fund) ने म्हटले आहे की, FGM मुळे उद्भवलेल्या आजारांचा सामना करणाऱ्या एकूण महिलांपैकी एक चतुर्थांष महिलांना उपचारही मिळत नाहीत. म्हणजेच जगभरातील सुमारे 5.2 कोटी महिलांना उपचार मिळत नाहीत. इजिप्तमध्ये गेल्या महिन्यात 12 वर्षाच्या एका मुलीचा मृत्यू केवळ खतना केल्यामुळे झाला होता, अशी बतमी प्रसारमाध्यमांनी दिली होती. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, ही पद्धत थांबवण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. (हेही वाचा, धक्कादायक! खोटी लग्न लावून तब्बल 629 पाकिस्तानी मुलींची चीनमध्ये विक्री; वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त)
डब्लूएचओच्या वैज्ञानिक डॉ. क्रिसटीना पेलिटो यांनी म्हटले आहे की, अनेक प्रदेशांमध्ये ही विकृती बंद करण्यासाठी कायदाही बनविण्यात आला आहे. 1997 मध्ये अफ्रीका आणि मध्य पूर्वेतील 26 देशांनी या प्रथेवर बंदी घातली. पेलिटो यांनी म्हटले आहे की, असे असले तरी जवळपास 33 देशांमध्ये ही प्रथा आजही दिवसाढवळ्या सुरुच असते. यूनिसेफने म्हटले आहे की, हे अतिशय चिंताजनक आहे. गेल्या दोन दशकांमध्ये FGM च्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जवळपास ही सख्या दुप्पट झाली आहे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.