Summer Tips: उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे 10 गुणकारी फायदे
उसाचा रस पिण्याचे 10 गुणकारी फायदे
मे महिना सुरु झाला झाला की, उकाडाही खूप जाणवायला लागतो. अंगाची लाही लाही करुन सोडणा-या ह्या उन्हामुळे लोकांचे पाय वळतात ते थंडगार शीतपेयांकडे... पण ही शीतपेय चवीला जितकी चांगली तितकीच पचायला जड असतात. त्यामुळे शीतपेय पिण्यापेक्षा शरीरास चांगले गुणकारी असे पेय म्हणजे उसाचा रस. शीतपेयांपेक्षा किंमतीने कमी असलेल्या ह्या रसाचे फायदे मात्र शीतपेयांच्या किंमतीपेक्षा तिपटीने जास्त आहे. गावाकडे उसाच्या रसाची रसवंती गृह बरीच पाहायला मिळतात आणि मग घुंगरांचा खळ-खळ असा आवाज येणा-या रसवंतीगृहाकडे आपोआप लोकांचे पाय वळतात. मुंबईतही अशी अनेक रसवंतीगृह आहेत. मात्र बदलत्या काळानुसार लोकांचा कल हा शीतपेयांकडे जास्त असतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला उसाचा रस पिण्याचे असे काही महत्त्वाचे फायदे सांगणार आहोत जे ऐकूनही तुम्हीही थक्क होऊन जाल
उसाचा रस पिण्याचे 10 गुणकारी फायदे:(Sugarcane Juice)
1. उन्हाळ्यात पित्ताचा त्रास होत असलेल्यांना उसाचा रस हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे पित्त कमी होते.
2. उन्हाळ्यात तुमच्या हाता-पायांची जळजळ होत असेल, तर अशा लोकांनी रोज उसाचा रस प्यावा.
3.उन्हामुळे येणारा थकवा दूर करण्यासाठी उसाचा रस एक चांगला पर्याय आहे.
4.नाकातून रक्त येणे, लघवीला आग होणे, जळजळ होणे अशा त्रासांवर उसाचा रस फायदेशीर ठरु शकतो.
5.उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या ब-याचदा उद्भवतो. अशा वेळी उसाचा रस प्यायल्याने डीहायड्रेशनपासून बचाव होतो.
6.उसाचा रस प्यायल्याने त्वचा उत्तम राहते आणि चेह-यावरचे डागही दूर होतात.
7. ज्यांना रोज गाडीतून फिरावे लागते, विशेषत: बाइक, स्कूटर चालविणा-यांनी दिवसातून 2 वेळा उसाचा रस प्यावा.
8. जर तुम्ही कमी पाणी पित असाल, तर उसाचा रस अवश्य प्या. ह्यामुळे शरीरातील रसाचे प्रमाण वाढते. तसेच शरीरातील पाण्याची कमतरता भरुन निघते, ज्यामुळे किडनी स्टोन यांसारख्या आजारापासून बचाव होऊ शकतो.
9. उसामुळे पचनशक्ती वाढते आणि पचनसंस्था सुरळीत होण्यास मदत होते.
10.उसाच्या रसामध्ये ग्लुकोजचे प्रमाण अधिक असल्यामुळे हे एक उत्तम एनर्जी ड्रिंक आहे, असं म्हणायला हरकत नाही.
उन्हाळ्यात सब्जा खाण्याचे आरोग्यदायी फायदे
उसाच्या रसाने केवळ ऊर्जा मिळत नाही, तर उन्हापासून बचावर करुन शरीराला शांत ठेवण्यास मदत होते. उसाच्या रसाचे हे फायदे नक्कीच तुमच्या फायद्याचे आहेत अशी आम्हाला खात्री आहे. पचायला जड असला तरीही शरीरात थंडावा निर्माण करणारा हा उसाचा रस आपल्यासाठी किती फायद्याचा आहे हे तुम्हाला कळलचं असेल. त्यामुळे शीतपेय न पिता उसाच्या रसासारखे आवश्यक पेय पिणे कधीही चांगले हेच आम्हाला ह्या लेखाद्वारे आपल्याला सांगायचे आहेत.