आत्महत्या करण्यासाठी व्यक्ती का प्रवृत्त होतो? तत्पूर्वी 'या' काही गोष्टी जरुर लक्षात ठेवा
दररोज कोणत्याही मीडियाच्या माध्यमातून आपल्याला आत्महत्येच्या गोष्टी आपल्या कानावर पडत असतात. मात्र आत्महत्या करणे हे एखाद्या संकटाला सामोरे न जाता त्यामधून पळ काढण्यासारखे आहे.
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणवर्गात आत्महत्या करण्याचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. दररोज कोणत्याही मीडियाच्या माध्यमातून आपल्याला आत्महत्येच्या गोष्टी आपल्या कानावर पडत असतात. मात्र आत्महत्या करणे हे एखाद्या संकटाला सामोरे न जाता त्यामधून पळ काढण्यासारखे आहे. तसेच आत्महत्या करण्यामागे बहुतांश कारणे असतील पण तत्पूर्वी आयुष्य आपल्याला हे एकदाच मिळते याचा सुद्धा व्यक्तीने विचार करायला हवा.
आयुष्यात उद्भवणारे अडथळे, विविध प्रश्न, संकटे यावर मात करुन पुढे जाण्यास शिकलो तरच यशाचा मार्ग सोपा होतो. मात्र आयुष्यात आलेल्या संकटांवर नेहमीच दुख व्यक्त केले किंवा त्यापासून पळ काढण्यासाठी मार्ग म्हणून आत्महत्या करणे हे चुकीचे आहे.
आत्महत्या करण्यामागील काही कारणे:
-सध्याची जीवनपद्धती ही काळानुसार बदलत आहे. त्यामधील एक मुख्य तणाव हे कारण आहे. तणावाखाली सध्याचा व्यक्ती जगत असून काही गोष्टींचा गुंता सहज सुटण्यासारखा न वाटल्यास अधिक चीडचीड व्यक्त केली जाते. धन-दौलत हे सर्वस्व असल्याची प्रवृत्ती अंगी पडल्याने यामुळे सुद्धा काही वेळेस आत्महत्या करण्यास व्यक्ती प्रवृत्त होते.
-तसेच सोशल मीडियाचा वाढता प्रभाव व्यक्तीवर सध्या फार पडत आहे. त्यामुळे लोकांच्या डोक्यात काही चुकीच्या पद्धतीने गोष्टी गेल्या असत्या त्या चुकीच्याच पद्धतीने त्याचा शेवट केला जातो. एखाद्या गोष्टीबद्दल निर्माण होणारे प्रेम किंवा भावना पुर्ण न झाल्यास व्यक्ती तणावाखाली जातो. याचा थेट मानसिक आरोग्यावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो.
-घरातील वातावर हे सध्या बिघडत चालल्याचे ही काही वेळस आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे तणावाखाली असलेल्या व्यक्तीला शांतता न मिळाल्यास ही आत्महत्या करण्यास प्रवृत्त होते.
-तसेच एखादा व्यक्ती डिप्रेशन मध्ये असल्यास त्याची काम करण्याची इच्छाशक्ती कमी होते. त्यामुळे व्यक्तीला आपण आयुष्य जगून काय फायदा अशी भावना मनात निर्माण झाल्यास आत्महत्या करण्याचा मार्ग अवलंबतात.(Live-In Relationship मधील कटकटीमुळे त्रस्त? लग्नाआधी एकत्र राहताना 'या' गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी)
मात्र तणावापासून दूर राहण्यासाठी काही मार्गांचा अवलंब करा. त्यामुळे आत्महत्या करण्यापूर्वी 'या' काही गोष्टी जरुर लक्षात ठेवा.
- आत्महत्येचा विचार करण्यापूर्वी शारिरीक,मानसिक स्तरावर काही मार्ग यापासून मिळतात का याचा विचार करावा.
-तसेच नियमित एका निश्चित वेळेत झोपणे किंवा उठणे याबद्दल ठरवावे. त्याचसोबत व्यायामासह संतुलित आहाराचा समावेश असावा. दारु आणि सिगरेटच्या व्यसनापासून दूर रहावे.
-मानसोपचार तज्ञांकडे जाऊन जाणवत असलेल्या तणावाचाबद्दल सांगावे. तसेच मनात येणारे नकारात्मक विचार दूर करण्यासाठी काही वेळ एखाद्या आवडत्या गोष्टीत गुंतवावे.
-घरातील मंडळींसाठी तणावातून थोडा वेळ काढा. मित्रमैत्रींना भेटण्यासाठी बाहेर फिरायला जावे. तसेच एकमेकांच्या समस्या जाणून-समजून घेतल्यास एकमेकांत प्रेमाची भावना वाढेल.
त्यामुळे वरील दिलेल्या काही गोष्टीं लक्षात ठेवाव्या. तसेच आत्महत्या करण्याचा विचार करण्यापूर्वी आपल्या परिवाराला किंवा अन्य व्यक्तीला याचा काय त्रास नंतर सहन करावा लागेल याचा सुद्धा विचार करा. तसेच स्वत:ला कधी एकटे न वाटू देता सर्वांमध्ये मिळून मिसळून रहा.
(सूचना: वरील दिलेली महिती ही केवळ मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. लेटेस्टली मराठी याची कोणतीही पुष्टी करत नाही.)