Wet Gram Benefits: दररोज सकाळी भिजलेल्या हरभऱ्याच्या सेवनामुळे होतील 'हे' आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या
सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या हरभऱ्याचे सेवन केल्याने रक्त शुद्ध राहण्यास मदत होते.
Wet Gram Benefits: तुम्ही दररोज सकाळी नाश्त्याला भिजवलेला हरभरा खाल्ला, तर तुमचं आरोग्य नक्कीच तंदुरुस्त राहू शकतं. भिजवलेल्या हरभरा खाल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढवेल तसेच पचनासंदर्भातील सर्व तक्रारी दूर होतील. याशिवाय तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल. हरभरा हा असा एक सुपर फूड आहे, जो आपल्या आरोग्यासाठी प्रत्येक बाबतीत योग्य आहे. भिजवलेल्या हरभ्यात प्रथिने, कर्बोदके, फायबर, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे असतात. सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या हरभऱ्याचे सेवन केल्याने रक्त शुद्ध राहण्यास मदत होते. हरभरा चेहऱ्यावर चमक आणतो. जर आपल्याला वजन वाढण्याची चिंता वाटत असेल, तर भिजवलेले हरभरे खा. हरभरा हा प्रोटीनचा उत्कृष्ट स्रोत आहे. हरभरा खाल्ल्याने लवकर पोट भरते आणि आपल्याला भूक लागत नाही. त्यामुळे लठ्ठपणावर नियंत्रण राहते. हरभरा हाडे आणि दात मजबूत ठेवतो. त्यात असलेले लोह आणि सोडियम आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. भिजवलेला हरभरा आरोग्यासाठी फायदेशीर कसा आहे हे खालील मुद्द्याच्या आधारे जाणून घेऊयात.
रोग प्रतिकारशक्ती वाढवते -
सकाळी रिकाम्या पोटी भिजलेली हरभरा खाल्ल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते. हरभऱ्यामध्ये जीवनसत्त्वे व्यतिरिक्त क्लोरोफिल आणि फॉस्फरस सारखे खनिजे आढळतात. जे रोगास शरीरापासून दूर ठेवतात. आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, दररोज मूठभर भिजवलेल्या हरभऱ्याचं सेवन नक्की करा. (हेही वाचा - थंडीच्या मौसमात Kiwi Fruit नक्की खा , पौष्टिकांनी भरलेले या फळाचे आयोग्यदायी फायदे जाणून घ्या)
पचनक्रिया सुधारण्यास मदत -
तुम्हाला जर आपली पचनक्रिया सुधारायची असेल तर दररोज भिजवलेले हरभरे खा. हरभरा बद्धकोष्ठता दूर करते. अॅसिडिटी कमी करण्यासाठी हरभरा खूप फायदेशीर आहे. तुम्ही सकाळी न्याहरीत मीठ, मिरची आणि कांदा घालून हरभरा खाऊ शकता.
मधुमेह नियंत्रित करण्यास मदत -
हरभरा आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतो. रिकाम्या पोटी सकाळी भिजवलेला हरभरा खाल्ल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळते.
थकवा दूर करण्याबरोबरचं, ऊर्जेचा उत्तम स्त्रोत -
जर तुम्हाला थकवा जाणवत असेल, तर तुम्ही हरभऱ्याचं सेवन करा. जर तुम्ही न्याहारीसाठी ओला हरभरा खाल्ला तर तुमच्या शरीराला उर्जा मिळेल आणि तुम्हाला दिवसभर थकवा जाणवणार नाही.
हरभरा त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त -
भिजवलेला हरभरा तुमच्या त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. यात अँटीऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे त्वचेवरील वृद्धत्वाचा प्रभाव कमी होतो. त्वचेबरोबरचं हरभरा केसांसाठीही फायदेशीर आहे. हरभऱ्याचं नियमित सेवन केल्यास केस निरोगी आणि मजबूत राहतात.