दृष्टी दिर्घकाळ टिकण्यासाठी नियमित करा या '5' गोष्टी !
त्यामुळे त्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येईल.
दिवसभर कंम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या समोर बसल्याने डोळ्यांचे नुकसान होते. त्याचबरोबर टीव्ही, स्मार्टफोन यामुळे डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येते. डोळे हा शरीरातील अत्यंत नाजूक अवयव. त्यामुळे त्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येईल.
आजकाल सतत होणारा कंम्प्युटर आणि स्मार्टफोनचा वापर टाळता येणे शक्य होत नाही. अशावेळी डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी नेमके काय करावे? तर डोळ्यांचे आरोग्य दीर्घकाळ टिकण्यासाठी दिनचर्येत या काही सवयींचा समावेश करणे आवश्यक आहे. त्यासाठी या खास टिप्स.... कॉन्टॅट लेन्सच्या वापराने उद्भवतील या '5' समस्या !
योग्य आहार घ्या
डोळ्यांचे आरोग्य योग्य राखण्यासाठी आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. आहारात मासे, अंडे, पालक, इतर पालेभाज्यांचा समावेश करा.
डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारा
डोळे डिहायड्रेट होऊ नये, म्हणून त्यावर नियमित थंड पाण्याचे हबके मारा. त्यामुळे स्वच्छ आणि हेल्दी राहतील. नियमित असे केल्याने दृष्टी टिकून राहण्यास मदत होते.
डोळ्यांचे व्यायाम करा
दोन्ही तळहात एकमेकांवर चोळा आणि उबदार झालेली हात डोळ्यांवर ठेवा. असे केल्याने डोळ्यांवरील ताण हलका होण्यास मदत होईल. त्याचबरोबर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली डोळ्यांचे इतर व्यायमप्रकार नियमित करा.
डोळे स्वच्छ करण्यासाठी गुलाबपाणी वापरा
अधिक वेळ कंम्प्युटरसमोर बसल्याने डोळ्यांची जळजळ होणे, डोळे चुरचुरणे, ड्राय होणे अत्यंत स्वाभिवक आहे. डोळ्यांच्या अशा समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी गुलाबपाण्याने डोळे साफ करा. त्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळेल आणि जळजळ कमी होईल.
सनग्लासेसचा वापर
उन्हात बाहेर पडताना डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी सनग्लासेसचा वापर करा. त्यामुळे सूर्याच्या युव्ही किरणांपासून डोळ्यांचे होणारे नुकसान टाळता येईल. मात्र सनग्लास युव्ही किरणांपासून सुरक्षा देणारा असणे अत्यंत गरजेचे आहे.