Vaccine On Omicron: सिरम इन्स्टिट्यूट ओमायक्रॉनच्या B5 व्हॅरियंटविरोधात लस निर्मिती करणार
ओमायक्रॉन व्हेरियंटवर लस विकसित करण्यासाठी काम करत असून या वर्षाच्या अखेरपर्यंत ही लस भारतीय बाजारात येणार आहे,अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली आहे.
कोरोना (Corona) विरोधात देशात कोव्हॅक्सीन (Covaxin) आणि कोव्हिशील्ड (Covishield) अशा दोन लसींची (Vaccine) निर्मिती करण्यात आली. या लसी केवळ भारतीयांसाठीचं नाही तर परदेशातील अनेक नागरिकांसाठी वरदान ठरल्या. मोठ्या प्रमाणावर भारतातून लसींची निर्यात करण्यात आली. तसेच भारत सर्वाधिक वेगान लसीकरण (Vaccination) पूर्ण करणाऱ्या देशांपैकी एक आहे. कोव्हॅक्सीन आणि कोव्हिशील्ड या दोन्ही लसी कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर तयार करण्यात आल्या होत्या. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Second Wave) अधिक प्रभाव दिसून आला तो ओमायक्रॉनच्या B5 व्हॅरियंटचा (Omicron Varient). त्याविरोधाच आता विशेष लस निर्मिती सिरम इंस्टीट्यूट (Serum Institute) कडून करण्यात येणार आहे अशी माहिती अदर पुनावाला (Adar Poonawala) यांनी दिली आहे.
ओमायक्रॉन व्हेरियंटवर (Omicron Varient) लस (Vaccine) विकसित करण्यासाठी काम करत असून या वर्षाच्या अखेरपर्यंत ही लस भारतीय बाजारात येणार आहे. भारतात विकसित होणारी लस ही बूस्टर लसीच्या (Booster Dose) रुपात घेतल्यास ती प्रभावी ठरेल असं अदर पुनावाला म्हणाले. भारतातील परिस्थीती पाहता ओमायक्रॉन व्हेरियंटविरोधात खास लस तयार करण्याची गरज आहे. हा व्हेरियंट गंभीर स्वरुपाचा असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे असं अदर पुनावाला म्हणाले. (हे ही वाचा:- Adar Poonawala: मंकीपॉक्सच्या लसीवर सिरम इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनास सुरुवात : आदर पूनावाला)
जगभरात सध्या ओमायक्रॉनच्या BA व्हेरियंटच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. अमेरिकेमध्ये यासाठी मॉडर्ना लसीच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO) दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. जगातील 50 देशांमध्ये कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. भारतात देखील कोरोना रूग्णांमध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ होत आहे. सध्या परिस्थिती चिंताजनक नसली तरी देशातील आरोग्य व्यवस्था भक्कमपणे काम करत असल्याचं दिसत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2022 09:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

