अमेरिकेत Brain-Eating Amoeba मुळे Texas मध्ये भीतीचे वातावरण, Naegleria Fowleri मुळे अल्पवयीन मुलगा दगावला; इथे जाणून घ्या या आजाराबद्दल अधिक माहिती

त्यावेळी त्याने तेथील नळामध्ये हा Naegleria Fowleri हा विषाणू सापडला. त्यामुळे येथील राज्यपालांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी येथे नैसर्गिक आपत्ती जाहीर केली.

Brain Eating Amoeba in Texas (Photo Credits: Wikipedia)

अमेरिकेतील टेक्सास (Texas) शहरात एका महाभयाण विषाणूमुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. सार्वजनिक पाण्यातून आलेला विषाणू मेंदू खात (Brain-Eating Amoeba) असल्याचे धक्कादायक माहिती समोर येत आहे. टेक्सासच्या दत्रिण पूर्व भागात पाण्यामधून हा अमीबा सापडला आहे. Naegleria Fowleri असे या आजाराचे नाव असून या जीवघेण्या विषाणूमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या विषाणूमुळे येथील एका 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याने येथील राज्यपाल Greg Abbott यांनी या देशात नैसर्गिक आपत्ती जाहीर केली आहे. तसेच लोकांना नळाचे पाणी पिऊ नका असे आवाहनही करण्यात आले आहे. पाण्यातील हा अतिसूक्ष्म विषाणू मेंदूतील मेद नष्ट करतो जे खूपच प्राणघातक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्राजोरिया देशातील हा मुलगा आपल्या घराबाहेरील बगीचा मध्ये खेळत होता. त्यावेळी त्याने तेथील नळामध्ये हा Naegleria Fowleri हा विषाणू सापडला. त्यामुळे येथील राज्यपालांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी येथे नैसर्गिक आपत्ती जाहीर केली.

Brain Eating Amoeba: अमेरिकेतील फ्लोरिडा मध्ये मानवी मेंदूचा नाश करणाऱ्या अमीबाचे नवीन प्रकरण; जाणून घ्या Naegleria Fowleri या गंभीर आजाराविषयी सविस्तर

काय आहे हा Naegleria Fowleri आजार?

मेंदू खाणारा हा अमीबा साधारणपणे तलाव, तळ, स्विमिंग पूल, नदी, गरम पाण्याचे झरे या ठिकाणी वाढतो. कारण येथील पाण्याचे योग्य रित्या शुद्धीकरण केलेले नसते. Naegleria Fowleri हा नाकावाटे आपल्या शरीरात जातो. फ्लोरिडा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हा आजार एकाकडून दुस-याकडे जात नसल्याने याचा संसर्ग होत नाही. तसेच हा जास्त प्रमाणात दूषित पाण्यातही आढळत नाही. पर्यावरणात हा विषाणू पसरलेला असतो.

मात्र तरीही हा खूप भीषण विषाणू असल्याने प्रत्येकाने योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. या आजारात माणसाला ताप, सर्दी आणि उलट्या होतात. यासोबत घसा खवखवणे, डोकेदुखी यांसारखे आजारही होतात. अमेरिकेत 1962 ते 2016 पर्यंत 143 व्यक्तींना हा आजार झाला होता मात्र त्यातील केवळ 4 लोकच वाचू शकले. हा आजार झालेले लोक 2 आठवड्यांच्या आतच मरतात.

नॅगलेरिया फाऊलेरी 115 डिग्री फारेनहाइट तापमानावर वाढतो. Naegleria Fowleri संक्रमण थांबवायचे वा त्यापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर नेहमी शुद्ध, गरम केलेले पाणी प्यावे. तसेच या पाण्याचा संपर्क नाकाशी होऊ देऊ नका. असे सांगण्यात येत आहे.