(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)
ही आहे ग्रीन टी पिण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ, जाणून घ्या सविस्तर
ते जर आपण पाळले तर या ग्रीन टी तुमच्या शरीरावर समाधानकारक असा फरक पडेल.
'चहा' हे एक असे पेय आहे जो सकाळचा कामाचा तजेलदारपणा कायम ठेवण्यास मदत करतो. चहा हा खेड्यापाड्यापासून शहरात ही तितकाच प्रसिद्ध आहे. चहा घेण्याच्या ब-याच पद्धती आहेत. आल्याचा चहा, मसाला चहा, वेलची चहा, उकाळा या त्यातल्याच काही निवडक. मात्र लोकांची लाईफस्टाईल जसजशी बदलू लागली तसतसे आपल्या वजनाला घेऊन लोक खूपच आग्रही बनू लागले. आणि मग या काहींसाठी या चहाची जागा घेतली ती 'ग्रीन टी' ने (Green Tea).
ग्रीन टी हे आजकाल हेल्थ ड्रिंक म्हणून खूप प्रसिद्ध झालं आहे. अगदी जिम ट्रेनरपासून डाएटिशनपर्यंत आणि ऑफिसमधल्या सहकाऱ्यापासून शेजारच्या मैत्रिणीपर्यंत सगळे जण ग्रीन टी पिण्याचा सल्ला देत असतात. मात्र हा ग्रीन टी कसा किती आणि कधी घ्यावा याचेही काही नियम आहेत. ते जर आपण पाळले तर या ग्रीन टी तुमच्या शरीरावर समाधानकारक असा फरक पडेल.
कधी प्यावी ग्रीन टी?
साधारणपणे दोन जेवणाच्या मध्ये ग्रीन टी पिता येऊ शकते. वजन कमी करायचे असल्यास अनेक तज्ज्ञ तो जेवणाबरोबर किंवा जेवणानंतर ग्रीन टी पिण्याचा सल्ला देतात. तुमचं पोट फार जास्त सेन्सीटिव्ह असेल तर असं करू नका. कारण ग्रीन टीमध्ये अल्कालाइन असतं. त्यासोबतच सकाळी आणि सायंकाळी ग्रीन टीचं सेवन करू शकता. मात्र संध्याकाळी खूप उशिरा ग्रीन टी चे सेवन करणे चांगले नाही. रिकाम्या पोटी कधीही ग्रीन टी चे सेवन करु नये.
ग्रीन टी पिण्याची योग्य पद्धत
दिवसातून केवळ 2 कप ग्रीन टी चे सेवन करणं पुरेसं आहे. एका दिवसात 2 पेक्षा अधिक ग्रीन टीचं सेवन करू नये. यापेक्षा जास्त प्रमाणात ग्रीन टी चे सेवन केल्यास पित्त, मळमळ होणे आणि झोप न लागणे यांसारखे आजार उद्भवू शकतात.
ग्रीन टी बनविण्याची योग्य पद्धत
सर्वप्रथम पाणी उकळावं. गॅस बंद करून त्यात ग्रीन टी पावडर किंवा ग्रीन टी डीप सॅशे टाकून झाकण ठेवावं आणि दोन मिनिटं ते मुरू द्यावं. चवीला किंचित लिंबू, आलं नाहीतर पुदिना किंवा गवती चहा घातला तरी चालेल; मात्र त्यात साखर किंवा दूध मात्र अजिबात घालू नये.
या सर्व गोष्टींचा नीट विचार ग्रीन टी चे सेवन केल्यास काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवेल. ग्रीन टीमुळे तुमची त्वचा नितळ होते, चयापचयाचे कार्य सुधारते. ग्रीन-टीमुळे केवळ तुमचं मनच शांत होतं असे नाही तर तुमच्या संपूर्ण शरीराच्या स्वास्थासाठी ग्रीन टी फायदेशीरच ठरते. म्हणूनच ग्रीन टी पिताना वर सांगितलेल्या गोष्टींचा नक्की विचार करा.
हेही वाचा - तुमचे सौंदर्य खुलविण्यासाठी फाटलेले दूध येईल कामी, पाहा फाटलेल्या दूधाचे अफलातून फायदे