तोंडाला चव नसणे म्हणजे कोरोना पॉझिटीव्ह? जाणून घ्या PHFI चे डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांचा सल्ला
तसंच कोरोनाची विविध लक्षणे देखील समोर येत आहेत. त्यात तोंडाला चव नसणे हे नवे लक्षण समोर येत आहे. त्यामुळे हे लक्षण दिसताच अनेकजण कोरोनाची लागण झाल्याचे मानत आहेत.
कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट कायम असून देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणित वाढत आहे. तसंच कोरोनाची नवनवीन लक्षणे देखील समोर येत आहेत. त्यात तोंडाला चव नसणे हे नवे लक्षण समोर आल्यानंतर हे लक्षण दिसताच अनेकजण कोरोनाची लागण झाल्याचे मानले जात आहे. यावर पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया (Public Health Foundation of India) कडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. "तोंडाला चव नसणे हे कोविड चे एक लक्षण आहे. परंतु, काही वेळेस तापामध्येही तोंडाला चव येत नाही. त्यामुळे कोणालाही असे लक्षण आढळल्यास डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे. ताप, थकवा, गळ्यात खवखव, श्वास घेण्यास त्रास होणे इत्याही ही कोरोना संसर्गाची लक्षणे आहेत. या लक्षणांसह तोंडाला चव नसल्यास किंवा कोणत्याही वस्तूचा वास येत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे," असा सल्ला PHFI चे अध्यक्ष डॉ. के. श्रीनाथ रेड्डी (Dr. K. Srinath Reddy) यांनी दिला आहे.
तोंडात रॅश हे कोविड 19 चं नवं लक्षण असल्याचे समोर आले आहे. परंतु, हे संभाव्य लक्षण आहे. त्यामुळे याबाबत अधिक अभ्यासाची गरज असल्याचे स्पेन संशोधकांचे म्हणणे आहे. दरम्यान त्वचेवरील रॅशेस आणि तोंडातील नाजूक त्वचेवरील रॅशेस हे कोविड-19 संसर्गाचा संकेत देतात असा निष्कर्ष आता समोर येत आहे. (Mouth Rash COVID 19 Symptom: तोंडात रॅश हे कोविड 19 चं संभाव्य लक्षण, अधिक अभ्यासाची गरज; स्पेन संशोधकांचा दावा)
आकाशवाणी समाचार ट्विट:
भारतातील कोरोना बाधितांच्या संख्येने 10 लाखांचा टप्पा पार गेला आहे. त्यातून 635757 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या देशात 342473 सक्रीय रुग्ण आहेत. तर एकूण 25602 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकार आणि आरोग्य यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.