Snakebites First Aid Tips: सर्पदंश झाल्यास जीवाचा धोका टाळण्यासाठी 'या' गोष्टी नक्की करा!
साप चावल्यानंतर जखमेभोवती खाज येणं, वेदना जाणवणं, सूज येणं या बाबी तो विषारी होता की बिनविषारी याची माहिती देतात.
सर्पदंश (Snakebite) हा सार्यांसाठी मनात धडकी भरवणारा आहे. वेळीच उपचार न केल्यास ही बाब जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे नेमका विषारी, बिनविषारी साप कोणता? हे ओळखण्यासाठी आणि सर्पदंशावर योग्य उपचार करण्यासाठी कोणती बाब लक्षात ठेवावी हे देखील तुम्हांला ठाऊक असणं आवश्यक आहे. अनेकदा सापांचा वावर हा उष्ण ठिकाणी किंवा उन्हाळ्यात अधिक असतो. त्यामुळे एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यात सर्पदंशाच्या अनेक घटना समोर येतात. पण आता पावसाळ्याच्या दिवसातही काळजी घेणं आवश्यक आहे. हे देखील नक्की वाचा: साप चावल्यावर या 7 प्रकारे मानवी शरीरात चढते विष, होतो मृत्यू; वाचा महत्त्वपूर्ण माहिती .
विषारी, बिनविषारी साप कसा ओळखाल?
साप चावल्यानंतर जखमेभोवती खाज येणं, वेदना जाणवणं, सूज येणं या बाबी त्याचे संकेत देतात. जर साप विषारी असेल तर व्यक्तीला मळमळणं, उलट्या होणं, शुद्ध हरपणं, थकवा जाणवणं, श्वास घ्यायला त्रास जाणवणं हा त्रास होतो.
सर्पदंश कसा ओळखायचा?
जखमेवर pair of puncture marks
दंश झालेल्या जागी सूज, लालसरपणा
दंशाच्या आजूबाजूला वेदना
अस्वस्थ वाटणं
श्वास घेणं कठीण होणं
दृष्टी धुसर होणं
लाळ, घाम मध्ये वाढ
चेहरा,घशाजवळ संवेदना न जाणवणं
सर्पदंशांनंतर काय कराल?
सर्पदंश झाल्याचं जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. साप विषारी, बिनविषारी आहे की नाही हे न पाहता डॉक्टरांची मदत घ्या. अनेकदा तुमचा अंदाज चुकू शकतो आणि लक्षणं दिसेपर्यंत विष शरीरात पसरलेलं असू शकतं.
जर तुम्हांला विषारी साप जरी चावला तरी शांत राहणं, फार हालचाल न करणं तुमच्या जीवावरचा धोका टाळू शकतो. सापाचं विष सर्पदंशानंतर थेट रक्तात जातं हे मिथक आहे. ते lymphatic system मधून शरीरात जाते. Lymph हे तुमच्या शरीरातील एक द्रव आहे ज्यामध्ये पांढऱ्या रक्त पेशी असतात.
साप ओळखण्याचा, पकडण्याचा, जखमी करण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका यामुळे पुन्हा हल्ला होण्याची शक्यता आहे. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे आता हॉस्पिटलमध्ये अनेक चाचण्यांमध्ये तुम्हाला कोणता साप चावला आहे हे ओळखता येणं शक्य आहे. त्यामुळे ते तुम्हाला सर्वात योग्य उपचार देऊ शकतात.
सर्पदंशावर उपचार करण्याच्या बर्याच जुन्या पद्धती आहेत ज्या आता मदतीपेक्षा जास्त नुकसान करतात. सर्पदंशाची जागा धुतल्यामुळे ते विष धुतले जाऊ शकते ज्याचा उपयोग रुग्णालयातील कर्मचारी तुम्हाला चावलेल्या सापाचा प्रकार ओळखण्यासाठी करू शकतात. सर्पदंशाच्या आजूबाजूला कापड ठेवा म्हणजे अतिरिक्त हालचाल झाली तरीही विष रक्तप्रवाहात सहजतेने जाणं टाळाल.
सर्पदंश झालेल्या भागी जर एखादी घट्ट गोष्ट असेल तर ती काढा. प्रामुख्याने अंगठी, अॅंकलेट, जोडवी, ब्रेसलेट... कारण जर तो भाग सूजला तर नुकसान होऊ शकते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)