Raw Garlic And Honey For Weight Loss: कच्चा लसूण आणि मधाचे मिश्रण खाऊन महिन्याभरात तुम्ही करू शकता वजन कमी; जाणून घ्या कसे कराल सेवन 

Photo Credit : pixabay

वजन कमी (Weight Loss) करणे खूप सोपे नाही, परंतु अगदी लहान आणि सोप्या आरोग्यदायी सवयी देखील आपल वजन कमी करण्याचा प्रवास थोडा जलद आणि सुलभ करण्यासाठी मदत करू शकतात.अशा काही आहार पध्दती आहेत जसे सकाळी आणि रात्री जेवणा आधी कोमट पाणी पिणे अशा काही गोष्टी केल्यामुळे तुमचे वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. या आणि अशा काही वजन कमी करण्यासाठीच्या काही घरगुती टिप्स आपल्याला माहितच असतता मात्र आज आम्ही तुम्हाला अशी काही टिप्स देणार आहोत जी आपल्यातील बऱ्याच जणांना माहीत असेल. ( Benefits Of Apple Cider Vinegar: वजन कमी करण्यापासून ते मुरुम घालवण्यापर्यंत बऱ्याच गोष्टींवर उपयोगी आहे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर, जाणून घ्या फायदे )

रिकाम्या पोटी मध घालून लसूण खाणे. हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. लसूण आणि मध हे कॉम्बिनेशन पहिल्यांदा ऐकल्यावर विचित्र वाटते.पण हे खुप फायदेशीर आहे. सकाळी कच्च्या लसणाच्या पाकळ्या खाल्याने पचन क्रिया सुधारण्यासाठी मदत होते.आणि ते तुमची बॉडी डिटॉक्स करते.उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यासाठी अशा अनेक आरोग्य समस्यांसाठी पाण्याबरोबर कच्चा लसूण हा सामान्य उपाय आहे.

वजन कमी करण्याबरोबरच मध आणि लसूणचे सेवन खाण्याचे पुढील ही फायदे आहेत

प्रतिकारशक्ती वाढवते

सर्दी आणि फ्लूवर गुणकारी

पाचक प्रणालीला चालना देते

शरीरास डिटॉक्सिफाई करते

वजन कमी करण्यासाठी मध आणि लसूण

जर तुम्ही 'डिटॉक्स मोड' मध्ये असाल तर लसूण आणि मध तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. कारण हे असामान्य टॉनिक आपल्या शरीरास संपूर्णपणे डीटॉक्सिफाई करण्यास मदत करू शकते. परंतु, कदाचित सर्वात मोठा आरोग्य लाभ पचन क्रिया सुधारणे याद्वारे वजन कमी करण्यास मदत करणे होय. आरोग्य तज्ञ बहुतेकदा म्हणतात की, चांगली पाचन त्वरित वजन कमी करण्याची गुरुकिल्ली आहे, आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासासाठी मध आणि लसूण हा एक उत्तम पर्याय आहे.शिजवलेल्या लसूण पेक्षा कच्या लसूण मध्ये जास्त पौष्टिक मूल्य असतात. जेणेकरून पूर्वीचे वजन कमी करण्यास मदत होते. तसेच सकाळी उपशी पोटी मध लसूण खाल्याने मेटाबॉलिजम (metabolism ) बूस्ट होण्यास मदत होते. हे उर्जेचे स्त्रोत देखील आहे, जे आपल्याला आपल्या सकाळच्या सर्व कामांमध्ये एनर्जी राहण्यास मदत करते.

वजन कमी करण्यासाठी कच्चा लसूण आणि मध याचे सेवन कसे कराल

आपण मध आणि कच्चे लसूण यांचे मिश्रण तयार करू शकता आणि दररोजच्या वापरासाठी ते एका बाटलीत भरून ठेवू शकता.यासाठी तुम्हाला लागणार आहेत फक्त फ्रेश लसणाच्या पाकळ्या आणि चांगल्या प्रतिचे मध. एका बातमीमध्ये किंवा जार मध्ये लसणाच्या पाकळ्या घाला आणि त्यावर लसूण पूर्णपणे भिजेल एवढे मध घाला.बाटलीला घट्ट झाकण लावून ठेऊन दया.हे मिश्रण चांगले मुरु दया आणि ननतर रोज सकाळी त्यातले थोडे तुम्ही चमच्याने काढून खाऊ शकता.या मिश्रणासाठी चांगले मध सापडणे गरजेचे कारन बऱ्याचदा बाजारात प्रक्रिया केलेल मध विकले जाते.तेव्हा मध घेताना ते नीट तपासून घ्या.

 

(टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif