Ratan Tata यांना होता 'हा' गंभीर आजार; हळूहळू सर्व अवयव झाले निकामी, काय आहेत या आजाराची लक्षणे? जाणून घ्या

त्यांच्यावर मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. रतन टाटा यांना कमी रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली.

Ratan Tata (Photo Credit - X/@EvanLuthra)

Ratan Tata: टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे केवळ उद्योगपती नव्हते तर ते एक तेजस्वी व्यक्तिमत्व असणारे व्यक्ती होते. देशातील प्रत्येक घरात टाटाची एकतरी वस्तू तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. रतन टाटा यांच्याबद्दल असे म्हटले जाते की त्यांनी नेहमीच भारतातील लोकांच्या गरजेनुसार व्यवसाय केला. गेल्या काही दिवसांपासून रतन टाटा यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. रतन टाटा यांना कमी रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली.

हृदयविकार तज्ज्ञ डॉ.शारुख अस्पी गोलवाला यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही रतन टाटा यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. वयानुसार उद्भवणाऱ्या समस्यांमुळे परिस्थिती अधिक कठीण झाली. मिळालेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांना रक्तदाब कमी झाल्यामुळे हायपोटेन्शनचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्या शरीरातील अनेक भाग हळूहळू काम करणे बंद झाले. त्यांना डिहायड्रेशनचा त्रासही होऊ लागला.

कमी रक्तदाब किती धोकादायक आहे?

जर तुमचा रक्तदाब 90/60 पेक्षा कमी असेल तर डॉक्टर त्याला कमी बीपी मानतात. कमी रक्तदाब आणि उच्च रक्तदाब दोन्हीचा धोका वाढत्या वयानुसार वाढतो. रक्तदाब कमी झाल्यामुळे वृद्ध लोकांमध्ये हृदय, मेंदू आणि इतर अवयवांना रक्तपुरवठा कमी होऊ लागतो. बीपी अचानक कमी झाल्यामुळे मेंदूला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ लागतो. अशा स्थितीत चक्कर येणे, डोके दुखणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

कमी रक्तदाबावर काय उपचार आहेत?

ज्या लोकांना कमी रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी उशीर न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीतही काही महत्त्वाचे बदल करायला हवेत.