Pandemic Fatigue :साथीच्या रोगाचा थकवा म्हणजे काय? कोरोना विषाणूचे भावनिक प्रभाव नियंत्रित करण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, लोक कोरोना विषाणूच्या भावनिक प्रभावांशी झगडत आहेत आणि त्याला सामोरे जाण्यासाठी काही संरक्षणात्मक उपाय पाळणे आवश्यक आहे.

प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: File Image)

साल 2020 मध्ये जगातील लोक कोरोना सारख्या साथीच्या रोगाचे शिकार झाले आहेत.आतपर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत जाऊन 36,044,751 वर पोहचला आहे ज्यातील 1,054,604 रुग्णांनी आपला जीव गमवाला असून यातील 27,149,095 यातून सुखरूप बाहेर पाडले आहेत.बधितांमध्ये अधिक रुग्णांना यातून बाहेर पडण्यात यश जरी मिळाले असले तरीही आता लोकांवर लोकांवर कोरोना विषाणूचा भावनिक परिणाम वर्चस्व गाजवू लागला आहे, याला महामारी थकवा देखील म्हणतात.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, युरोपात वाढत्या पातळीवर संघर्ष होत आहे. या साथीच्या रोगामुळे लोक स्वतःला आणि आपल्या माणसांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की 60% अधिक लोक साथीच्या रोगाच्या थकव्याचा सामना करत आहेत.WHO च्या अनुसार,लोक कोरोना विषाणूच्या भावनिक प्रभावांशी झगडत आहेत आणि त्याला सामोरे जाण्यासाठी काही संरक्षणात्मक उपाय पाळणे आवश्यक आहे.

  साथीच्या रोगाचा थकवा म्हणजे काय?

WHO ने अलीकडेच हे उघड केले आहे की युरोपियन प्रदेशातील देशातील लोकांमध्ये साथीच्या रोगाच्या थकव्याचे संकेत दिसत आहेत. साथीच्या रोगाचा थकवा हे डिमोटिव्हेशन म्हणून परिभाषित केले गेले आहे, जे हळूहळू कालांतराने उदयास येत आहे आणि बर्‍याच भावना, अनुभव आणि धारणा द्वारे प्रभावित आहे.या साथीचा परिणाम जगभरातील लोकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्रास होत आहे, ज्यामुळे लोक भावनिक संकटातून जात आहेत. चला जाणून घेऊयात कोरोना विषाणूचे भावनिक प्रभावावर कसे नियंत्रित करावे

आपल्यातील बऱ्याच जणांना बर्नआउटअणि थकवा जाणवू शकतो. जो सतत मास्क घातल्याने ,सतत स्वच्छता ठेवणे आणि सामाजिक अंतर पाळल्यामुळे होऊ शकतो. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला पाहतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या लोकांवर साथीच्या रोगाच्या थकवाचे भिन्न परिणाम दिसू शकतात. काही लोकांना चिडचिड होणे आणि अस्वस्थ वाटत असेल तरी काही लोकांमध्ये शांतता आणि प्रेरणा नसल्याची समस्या येऊ लागली आहे, ज्यामुळे एकाग्रता आणि समाजीकरणात अडचण येत आहे.

काय करू शकता?

साथीच्या रोगाच्या थकव्याचा सामना करण्याचा मार्ग व्यक्ती-व्यक्तीमध्ये बदलू शकतो. दरम्यान हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की आपल्याला या नकारात्मक भावनांमधून बाहेर पडावे लागेल. आपण कोविड -19 शी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे सकारात्मकपणे अनुसरण केले पाहिजे जेणेकरुन आपण स्वत: ला आणि इतरांना या संसर्गापासून वाचवू शकता.

- सकारात्मक बाबींकडे पहा. उदाहरणार्थ, संरक्षणात्मक उपायांचे अनुसरण करून आपण केवळ स्वत: चेच नव्हे तर जगाची सेवा करीत आहात असा विचार करा.

- असे समजून घ्या की आपण संकटात असलेल्यांसाठी संरक्षणात्मक उपायांचे अनुसरण करीत आहात.

- जरी या साथीच्या विरूद्ध लढायला अधिक वेळ लागू शकतो, परंतु ही वेळ देखील निघून जाईल.

- आपली जीवनशैली पूर्णपणे बदलण्याची ही वेळ आहे, साथीच्या रोग आपल्याला अधिक निरोगी राहण्यास मदत करत आहे.

- बदल नेहमी चांगले असतता आणि त्यापासून कोणताही महत्त्वाचा धडा शिकला जाऊ शकतो,मार्ग कितीही कठीण असला तरी ही.

दरम्यान, या महामारीच्या वेळी आपण स्वत: ला किंवा आपल्या प्रियजनांना नकारात्मक झालेले पाहू शकता, तर काही लोकांमध्ये मानसिक बिघाड होऊ शकतो. काही लोकांनासर्व संपले आणि तुटल्यासारखे वाटू शकते, तर काहींच्या खाणे आणि झोपेच्या पद्धतींमध्ये बदल यासारखे लक्षणे देखील दिसू शकतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now