नाकात बोट घालण्याची सवय आहे? तर थांबा आधी हे वाचा
परंतु ही सवय बहुदा घाणेरडेपणाची लक्षणे असल्याचे म्हटले जाते.
अनेक लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नाकात बोट घालण्याची सवय असते. परंतु ही सवय बहुदा घाणेरडेपणाची लक्षणे असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच जर नाकात बोटे घालण्याची सवय जडली असेल तर थांबा आधी हे वाचा.
नाकात बोट घालण्याच्या सवयीमुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता असल्याचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. तर ही सवय जास्त करुन लहान मुलांमध्ये पाहावयास मिळते. लहान मुलांच्या या नाकात बोट घालण्याचा सवयीमुळे न्युमोकॉकस या विषाणूचा संसर्ग होऊन न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा पद्धतीची सवय जीवावर बेतण्याची शंका असते. तर या सवयीचे संशोधन युरोपियन रेस्पायरेटरी जर्नल या एका वैद्यकिय अहवालानूसार देण्यात आली आहे.
या सवयीमुळे न्युमोकॉकसचे विषाणू हे दमट आणि कोरड्या हवेत सहज आढळून येतात.त्यामुळे जास्त करुन लहान मुलांच्या हातावर किंवा खेळण्याच्या वस्तूंवर हे विषाणू असतील आणि नाकात बोट घातली तर ते महागात पडू शकते असे डॉ. व्हिक्टोरिया कॉनर यांनी सांगितले आहे.