COVID 19 In India: शाकाहारी, धुम्रपान करणार्‍यांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका कमी याचा थेट संबंध नसल्याचं CSIRचं स्पष्टीकरण

भारतामध्ये कोरोनाचं संकट गडद होत असतानाच देशामध्ये पुन्हा सीरो सर्व्हे करण्यात आला आहे. या अहवालानुसार, स्मोकर्स (धुम्रपान करणारे), शाकाहारी यांच्यामध्ये सेरो पॉझिटीव्हीटी तुलनेत कमी असल्याचं आढळलं आहे.

COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये कोरोनाचं संकट गडद होत असतानाच देशामध्ये पुन्हा सीरो सर्व्हे करण्यात आला आहे. या अहवालानुसार, स्मोकर्स (धुम्रपान करणारे), शाकाहारी यांच्यामध्ये सेरो पॉझिटीव्हीटी तुलनेत कमी असल्याचं आढळलं आहे.  दरम्यान ओ रक्तगटातील मंडळी देखील कोरोनाच्या विळख्यात आढळण्याचे प्रमाण कमी असल्याचं पहायला मिळालं आहे असे टॉप रिसर्च बॉडीच्या अहवालात सांगण्यात आल्याचही म्हटलं आहे. म्हणून धुम्रपान, शाकाहारी जेवण तुमचं कोरोनापासून संरक्षण करेल असा तुमचा समज झाला असेल तर थांबा कारण याचा कोणताही थेट संबंध नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

भारतभर Council of Scientific and Industrial Research (CSIR)कडून करण्यात आलेल्या सीरोसर्व्हे मध्ये कोविड 19 ला कारणीभूत असलेल्या SARS-CoV-2 च्या विरूद्धच्या अ‍ॅन्डिबॉडीजचा अभ्यास करण्यात आला तसेच संसर्ग होण्याच्या संभाव्य जोखीम घटकांची अनुमान काढण्याची त्यांची तटस्थता क्षमता देखील यावेळी तपासण्यात आली आहे.

CSIR ने 140 डॉक्टर्स, संशोधक यांच्यासोबतीने देशभर 40 CSIR लॅब मधील व्यक्ती आणि त्यांच्या परिवारांचा असा एकूण 10,427 जणांचा अहवाल घेण्यात आला. यामध्ये अर्बन, सेमी अर्बन भागांचा समावेश होता. या लोकांनी स्वच्छेने अभ्यासामध्ये समावेश नोंदवला होता. COVID-19: रक्तातील ऑक्सिजन लेव्हल कशी वाढवावी? रक्तात काय असते याची भूमिका, जाणून घ्या आरोग्य तज्ञांचे मत.

सेरो सर्व्हेच्या अहवालानुसार, कोविड 19 हा श्वसनाची निगडीत आजार असला तरीही स्मोकिंग हे पहिल्या पातळीवरील श्लेष्म उत्पादन वाढवण्याच्या भूमिकेमुळे ते संरक्षक म्हणून काम करत असल्याचं समोर आले आहे. मात्र असे असले तरीही कोरोनाव्हायरस संक्रमणावर धूम्रपान आणि निकोटीनचा काय परिणाम होतो हे समजण्यासाठी लक्ष केंद्रित तंत्रज्ञानाच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. "धूम्रपान हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आणि अनेक आजारांशी संबंधित असल्याचे मानले जाते आणि या निरीक्षणाला धुम्रपानासाठी endorsement समजले जाऊ नये. विशेषत: जेव्हा त्यांचा नेमका संबंध अद्याप सिद्ध झालेला नाही," असे या पत्रकात म्हटले आहे. इथे पहा सविस्तर पीअर ग्रुप रिव्ह्यू .

शाकाहारी जेवणामध्ये फायबर युक्त पदार्थांच्या समावेशामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती बळकट होण्यास मदत झाली. आतड्यांच्या मायक्रोबायोटामध्ये बदल करून त्याच्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे ते फायदेशीर ठरत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान सीरो सर्व्हे मध्ये ज्यांचा रक्तगट ओ आहे ते कोरोनाच्या विळख्यात कमी आल्याचंही समोर आले आहे. तर बी आणि एबी रक्तगटातील मंडळींना अधिक धोका असल्याचेही सांगण्यात आले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now