Nipah Virus Death in Kerala: केरळ मध्ये 23 वर्षीय तरूणाचा निपाह मुळे मृत्यू; Masks झाले पुन्हा बंधनकारक

आरोग्य मंत्र्यांच्या माहितीनुसार, जीव वाचवण्यासाठी आणि पुढील संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभाग लवकर निदान आणि उपचाराच्या उपाययोजना करत असल्याची ग्वाही देण्यात आली आहे.

Nipah Virus, Death Image (PC - Pixabay/File Photo)

केरळच्या Malappuram मध्ये एका 23 वर्षीय तरूणाचा निपाह वायरसच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. यानंतर स्थानिक प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये मास्क बंधनकारक केला आहे. Health and revenue officials कडून आता रूग्णाच्या जवळच्या व्यक्तींचे ट्रेसिंग सुरू आहे. आतापर्यंत 151 जणांना आयसोलेटेड करण्यात आले आहे. आयसोलेशन मध्ये असलेल्या 5 जणांना देखील सौम्य लक्षणं आहेत.सध्या त्यांचे सॅम्पल्स देखील टेस्टींगला पाठवण्यात आले आहे.   मृत 23 वर्षीय व्यक्ती बेंगलूरूचा विद्यार्थी होता. तर त्याचे मूळ गाव Chembaram आहे. मागील सोमवारी त्याचे खाजगी रूग्णालयात निधन झाले. Kozhikode Medical College मध्ये झालेल्या टेस्ट मध्ये त्याचा निपाह वायरस ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

Health Minister Veena George यांनी Pune virology lab कडूनही रूग्णाला निपाहची लागण झाल्याचं म्हटलं आहे. Thiruvali panchayat आणि आजुबाजूच्या चार वॉर्ड मध्ये कडक प्रोटोकॉल लागू केले आहेत.पुढील आदेशापर्यंत स्थानिक थिएटर, शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. दरम्यान विनाकारण लोकांनी एकत्र जमणं टाळावं आणि एखादा इव्हेंट असल्यास निपाह प्रोटोकॉल पाळणं आवश्यक आहे.

मृत तरूण नुकताच बेंगलुरू मधून आला होता. त्याच्या पायाला इजा झाली होती. नंतर त्याला ताप आला आणि त्याने स्थानिक दोन मेडिकल क्लिनिक्सला गेला होता पण आराम मिळत नसल्याने Perinthalmanna च्या एका रूग्णालयामध्ये गेला. तेथेच त्याने शेवटचा श्वास घेतला.

निपाह वायरस मुळे 21 जुलैला एका 14 वर्षीय मुलाचा देखील मृत्यू झाला होता. तेव्हाही प्रशासनाने clampdown केला होता. 2018 मध्ये 18 जणांचा जीव निपाह वायरसने गेला होता. हा आजार वटवाघुळांमधून माणसांमध्ये आलेला आहे. फ्रूट बॅट्स द्वारा हा जीवघेणा वायरस येत आहे.

आरोग्य मंत्र्यांच्या माहितीनुसार, जीव वाचवण्यासाठी आणि पुढील संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभाग लवकर निदान आणि उपचाराच्या उपाययोजना करत असल्याची ग्वाही देण्यात आली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now