कोरोना पुन्हा वाढणार टेन्शन! नवीन XE प्रकार Omicron BA.2 पेक्षा 10 पट जास्त संसर्गजन्य; WHO चा दावा
अहवालानुसार, XE चा समुदाय वाढीचा दर BA.2 च्या तुलनेत 10 टक्के जास्त असल्याचे सूचित करण्यात आले आहे.
XE Variant: कोरोना विषाणूचा नवीन उत्परिवर्ती प्रकार XE हा Omicron च्या BA.2 च्या सबव्हेरियंटपेक्षा 10 पट जास्त संसर्गजन्य असू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याबाबत चिंता व्यक्त केली आहे. XE हा ओमिक्रॉनच्या BA.1 आणि BA.2 या दोन व्हेरियंटने मिळून बनलेला प्रकार आहे. डब्ल्यूएचओने आपल्या अलीकडील अहवालात म्हटले आहे की, जोपर्यंत त्याच्या प्रसार दर आणि रोगाच्या लक्षणात बदल होत नाही तोपर्यंत तो ओमिक्रॉन प्रकाराशी जोडला जाईल.
अहवालानुसार, त्याचा समुदाय वाढीचा दर BA.2 च्या तुलनेत 10 टक्के जास्त असल्याचे सूचित करण्यात आले आहे. तथापि, याची पुष्टी करण्यासाठी डेटा आवश्यक आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, BA.2 उप-प्रकार आता जगासाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय बनला आहे. अनुक्रमित प्रकरणांच्या संख्येपैकी सुमारे 86 टक्के आहे. (हेही वाचा - Delta+Omicron ने बनलेला नवीन विषाणू Deltacron ची लक्षणे काय आहेत? भारतातही आढळले प्रकरणे; किती धोकादायक आहे हा विषाणू, जाणून घ्या)
दरम्यान, XE स्ट्रेन पहिल्यांदा यूकेमध्ये 19 जानेवारीला आढळला होता आणि तेव्हापासून 600 हून अधिक XE प्रकरणांची पुष्टी झाली आहे. ब्रिटनच्या हेल्थ प्रोटेक्शन एजन्सी (HSA) चे मुख्य वैद्यकीय सल्लागार सुझान हॉपकिन्स म्हणतात की, कोविड-19 लसींची संसर्ग, तीव्रता किंवा त्यांच्यावरील परिणामकारकतेबद्दल निष्कर्ष काढण्यासाठी अद्याप पुरेसे पुरावे नाहीत.
डब्ल्यूएचओने अहवालात म्हटले आहे की, ते XE सारख्या रीकॉम्बिनंट प्रकारांच्या धोक्यांवर लक्ष ठेवत राहतील आणि त्याच्याशी संबंधित पुरावे जमा करतील. सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमधील निर्बंध हटवण्यात आले आहेत.