मधुमेह, कॅन्सर, अस्थमा यांसारख्या आजारांवरील 78 औषधे होणार स्वस्त

सरकारच्या या निर्णयामुळे 78 औषधे स्वस्त होणार आहेत.

Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

रुग्णांच्या सोयीसाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 78 औषधे स्वस्त होणार आहेत. यात कॅन्सर, मधुमेह आणि अस्थमा यांसारख्या आजारांवरील औषधांचा समावेश आहे. सरकारने कॅन्सरवरील 42 नॉन-शेड्यूल्ड औषधांच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यात ट्रेड मार्जिन (trade margins) 30% केले आहे. राष्ट्रीय औषधं मुल्य निर्धारण प्राधिकरणने (National Pharmaceutical Pricing Authority) किंमत नियंत्रण आदेश पॅरा 19 च्या नुसार, कॅन्सर आणि इतर काही आजारांवरील औषधांचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

औषधं विभागाने जारी केलेल्या सुचनेत म्हटले आहे की, या अंतर्गत 42 नॉन-शेड्यूल्ड औषधांवरील ट्रेंड मार्जिन 30% नी कमी करुन आणि उत्पादन खर्च लक्षात घेऊन औषधांच्या किंमती ठरवण्यात आल्या आहेत.

एनपीपीए (NPPA) ने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या निर्णयामुळे 105 ब्रँडच्या औषधांच्या किंमती 85% नी कमी करण्यात आल्या आहेत. तसंच कॅन्सरवरील 75 औषधांच्या किंमती नियंत्रणात आल्या आहेत. याशिवाय कॅन्सर, मधुमेह, इंफेक्शन, अस्थमा यांसारख्या आजारांवरील 36 औषधांच्या किंमती ठरवण्यात आल्या आहेत. तर 22 औषधांच्या किरकोळ किंमती निश्चित केल्या आहेत आणि 14 औषधांच्या किंमतीत सुधारणा केली आहे.

बुडसोनैड इनहेलेशन आणि झेंटामायसीन इंजेक्शन यांच्या किंमतीत सुधारणा केली आहे. बुडसोनाईडचा वापर अस्थमासाठी केला जातो. याशिवाय, इतर औषधांच्या किंमतींमध्ये मेटाफॉर्मिनसह ट्रस्टुजॅमॅम इंजेक्शन आणि ग्लायकोलाझाईड टॅब्लेट (डायबिटीज प्रकार 2 च्या उपचारांसाठी) सुधारणा करण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif