Mumbai Monsoon-Related Diseases: मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, एच1एन1 रुग्णांमध्ये वाढ; BMC ने जारी केल्या आरोग्य सूचना

बीएमसीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एपिडेमिक सेलने गुरुवारी ही माहिती दिली.

BMC (File Image)

Mumbai Monsoon-Related Diseases: ऑगस्ट 2023 च्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टमध्ये मुंबईत (Mumbai) पावसाळ्याशी संबंधित आजारांची (Monsoon Related Diseases) अधिक नोंद झाली आहे. शहरात नुकत्याच झालेल्या पावसामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, गॅस्ट्रो, लेप्टो, एच1एन1 (H1N1) आणि हिपॅटायटीस यासह पावसाळ्याशी संबंधित आजार वाढत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) गुरुवारी जलजन्य आणि वेक्टर-जनित आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य मार्गदर्शक नियमावली जारी केली. नागरी संस्थेने लोकांना ताप आल्यास स्वत: औषधोपचार घेणे टाळून, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असा सल्ला दिला आहे.

रुग्णांची संख्या-

ऑगस्ट 2023 च्या तुलनेत ऑगस्ट 2024 मध्ये (1 ते 14) सर्व रोगांमध्ये किंचित वाढ दिसून येते. चिकुनगुनिया आणि डेंग्यू हे एडिस डासांमुळे पसरणारे आजार आहेत, जे साचलेल्या पाण्यात पैदास करतात. त्यांची पैदास रोखण्यासाठी, नागरिकांनी घरांमध्ये आणि परिसरातही पाणी साचणार नाही याची खात्री करणे गरजेचे आहे.

बीएमसीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे नष्ट  व्हावीत यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे.

बीएमसीने जारी केलेल्या सुचना-

रस्त्यावरील/न झाकलेले अन्न खाणे टाळा, खाण्यापूर्वी हात धुवा किंवा हँड सॅनिटायझर वापरा. उकळलेले पाणी प्या. (हेही वाचा: Microplastics in Salt and Sugar: भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व ब्रँडच्या मीठ आणि साखरेत आढळले मायक्रोप्लास्टिक; अभ्यासात धक्कादायक खुलासा)

गर्दीची ठिकाणे टाळा, शिंकताना किंवा खोकताना नाक झाका, वारंवार साबण आणि पाण्याने हात धुवा, जास्त जोखीम असलेल्या व्यक्तींनी मास्क वापरावे.

घरांमध्ये किंवा इमारतींच्या आसपास पाणी साचणार नाही याची खात्री करा, मच्छरदाणी किंवा डासांपासून बचाव करणारी उत्पादने वापरा.

जर कोणाला ताप आला तर स्वत: औषधोपचार टाळा आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif