Covid-19: कोरोना विषाणूमुळे मनोरूग्णांच्या संख्येत 20 टक्क्यांनी वाढ; इंडियन सायकॅट्रिस्ट सोसायटीची माहिती

जगभरातील 170 हून अधिक देश कोरोना विषाणूच्या विळख्यात आकडले आहेत. तसेच कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. यातच कोरोना विषाणूने आणखी एका धोक्याला आमंत्रण दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. जगभरातील 170 हून अधिक देश कोरोना विषाणूच्या विळख्यात आकडले आहेत. तसेच कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. यातच कोरोना विषाणूने आणखी एका धोक्याला आमंत्रण दिले असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणूमुळे मानसिक आरोग्य धोक्यात असून गेल्या काही दिवासांपासून मनोरुग्णांच्या (Mental health) संख्येत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती भारतीय मानसोपचारतज्ज्ञ संस्थाने (Indian Psychiatry Society) दिली आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांच्या वागण्यातही बदल झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. कोरोनामुळे मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.

भारतीय मानसोपचारतज्ज्ञ संस्थेच्या सर्वेक्षणानुसार, भारतात करोना विषाणू दाखल झाल्यापासून मनोरुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव वाढू लागल्याने लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात नकारात्मक विचार पसरले आहेत. तसेच काही लोक तणावाखाली जगत असल्याची माहिती समोर आली आहे. यात संचारबंदीने आणखी भर टाकली आहे. संचारबंदीत लोक घरीच राहिल्याने परिस्थिती अजून बिघडली आहे. भारतीय मानसोपचारतज्ज्ञ संस्थने जानेवारी महिन्यात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने जारी केलेल्या अहवालानुसार प्रत्येक 5 भारतीयांच्या मागे एका व्यक्तीला आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना विषाणूमुळे केवळ शारिरीक नव्हेतर मानसिकरित्याही लोक आजारी पडू लागल्याचे समोर आले आहे. हे देखील वाचा- एप्रिल फूलच्या निमित्ताने कोरोनासंबंधित अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर क्राईमच्या माध्यमातून कारवाई केली जाणार; महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा नागरिकांना स्पष्ट इशारा

जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 6 लाख 97 हजार 244 वर पोहचली आहे. यांपैकी 32 हजार 257 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 45 हजार 696 रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भारतही कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 हजार 108 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 42 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 101 लोक बरे झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 225 वर पोहचली आहे. यात 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 35 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.