Measles In Mumbai: मुंबईकरांच्या चिंतेत भर! शहरात अचानक पसरला गोवर, जाणून घ्या लक्षणं

तर चिमुकल्यांमध्ये विशेषता हा आजार दिसुन येतो. विशेष म्हणजे गोवर या आजारावर कुठलाही उपचार नसुन आवश्यक ती काळजी घेणं हाचं त्यावरचा एक रामबाण उपाय आहे.

मुंबईकरांच्या (Mumbai) चिंतेत भर घालणारी बातमी पुढे येत आहे. शहरात डोळ्यांच्या साथीनंतर आता गोवरच्या (Measles) साथीने तोंड काढलं आहे. गेले काही दिवसांतचं गोवरचे अनेक रुग्ण आढळले आहेत. तर चिमुकल्यांमध्ये विशेषता हा आजार दिसुन येतो. विशेष म्हणजे गोवर या आजारावर कुठलाही उपचार नसुन आवश्यक ती काळजी घेणं हाचं त्यावरचा एक रामबाण उपाय आहे.  म्हणून  गोवरच्या लक्षणांची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला त्या पध्दतीचे कुठलेही लक्षणे आढळल्यास तुम्ही वेळेवर योग्य तो प्राथमिक उपचार घेवू शकाल. तरी लहान मुलांमध्ये हा आजार प्रामुख्याने दिसुन येतो. तरी शहरात गोवरच्या रुग्णाची संख्या कमालीची वाढतांना दिसत आहे. दरम्यान शरीरावर पुरळ येणे, अंगात ताप भरणे आणि डोळ्यांतून पाणी वाहणे अशी विविध लक्षणे दिसुन येत आहे.

 

गोवर हा लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक संसर्गजन्य आजार आहे. गोवर टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लसीकरण (Measles Vaccination) करणे. मुलांना गोवरपासून वाचवण्यासाठी त्यांना गोवर लसीचे 2 शॉट दिले जातात. गोवर आजाराचा उद्रेक झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता गोवरप्रतिबंधक मोहीम सुरू केली आहे. (हे ही वाचा:- Nose-Picking And Alzheimer's: नाकात बोट घालता का तुम्ही? वेळीच व्हा सावध, होऊ शकतो हा गंभीर आजार)

 

तरी गोवरची लागण झालेल्या बाळाची देखील विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. गोवर आल्यानंतर बाळाला आराम करू द्या. आपल्या पाल्याला संक्रमण झाले असल्यास त्याला इतरांच्या संपर्कात जाण्यास टाळावे. दरम्यान रुग्णाने भरपूर पाणी, ज्यूस यांप्रकारचे द्रव पदार्थ प्यावे. मुलाचे शरीर ओल्या कापसाने स्वच्छ करा. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपल्या पाल्याचा औषधी उपचार करावा.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif