Male Menopause: महिलाच नव्हे पुरुषांमध्येही असतो 'मेनोपॉज'; जाणून घ्या लक्षणे आणि घ्यावयाची काळजी

पुरुषांमध्ये मेनोपॉजला पीरियड एंड्रोपॉज म्हटले जाते. अभ्यासक आणि तज्ज्ञांच्या मते ही एक महिलांप्रमाणेच आढळणारी प्रक्रिया आहे. ज्याला मेल मेनोपॉज (Male Menopause) म्हणून ओळखले जाते. जाणून घ्या मेल मेनोपॉज लक्षणे (Male Menopause Symptoms) आणि घ्यावयाची काळजी. (Male Menopause Precautions)

Male Menopause | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

'मेनोपॉज' (Menopause ) हा महिलांच्या बाबतीत अगदी परिचयाचा शब्द. मेनोपॉझ म्हणजे महिलांच्या वयाची ती वेळ ज्यात हार्मोनल बदल होऊन मासिक पाळी येणे हळूहळू कमी होत जाऊन थांबते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते. साधारण वयाच्या चाळीसाव्या वर्षानंतर सुरु होते. अर्थात, व्यक्तीपरत्वे यात शरीर, आहार, आजारपण , जीवनशैली, अनुवांशिकता यांमुळे बदल होऊ शकतो. महिलांबाबत मेनोपॉज ही सर्वसाधारणच बाब. पण अनेकांना आश्चर्य वाटू शकते केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांमध्येही मेनोपॉज (Male Menopause) आढळू शकतो. अर्थात, पुरुषांना महिलांप्रमाणे नेहमी मासिक पाळी येत नाही. पण, हार्मोनल बदलांमुळे एका नव्या आणि विशिष्ट परिस्थितीतून पुरुषांना जावे लागते. पुरुषांमध्ये मेनोपॉजला पीरियड एंड्रोपॉज म्हटले जाते. अभ्यासक आणि तज्ज्ञांच्या मते ही एक महिलांप्रमाणेच आढळणारी प्रक्रिया आहे. ज्याला मेल मेनोपॉज (Male Menopause) म्हणून ओळखले जाते. जाणून घ्या मेल मेनोपॉज लक्षणे (Male Menopause Symptoms) आणि घ्यावयाची काळजी. (Male Menopause Precautions)

अभ्यास सांगतात की, जेव्हा पुरुषांमध्ये एस्ट्रोजन हॉर्मोन कमी होऊ लागतात तेव्हा महिलांमध्ये मेनोपॉज काळ सुरु होतो. त्याच प्रमाणे पुरुषांमध्येही टेस्टोस्टेरोन हॉर्मोन कमी झाल्यामुळे हा काळ सुरु होतो. साधारणपणे पुरुषांमध्ये हा काळ पन्नाशीनंतर सुरु होतो. पुरुष जेव्हा वयाच्या पन्नाशीत प्रवेश करतात तेव्हा एंड्रोपॉजचा सामना करतात. ज्यामुळे त्यांच्या शरीरात अनेक बदल होतात. (हेही वाचा, जास्त Sex करणाऱ्या महिलांमध्ये Menopause ची शक्यता कमी; रिसर्चमधून मासिक पाळीबद्दल आश्चर्यकारक खुलासा)

मेल मेनोपॉज लक्षणे

पुरुष जेव्हा मेल मेनोपॉजचा सामना करतात तेव्हा त्यांची काम करण्याची क्षमता आणि उर्जा दोन्ही कमी होऊ लागतात. सेक्स करण्याची त्यांची इच्छाही कमी होऊन जाते. या काळात शरीरात काही बदलही होतात. ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. मानसिक स्थितीवरही परिणाम होतो. ज्यामुळे मनस्थितीत बदल, नैराश्य, उदासिनता अशा स्थितींचा सामना करावा लागतो. याचा परिणाम झोपेवर होतो.

काय काळजी घ्याल?

साधारण वयाच्या पन्नाशीमध्ये पुरुषांमध्ये मेल मेनोपॉजची लक्षणे दिसू लागतात. अशा वेळी फार काळजी करण्याची गरज नाही. कारण हे घडू शकते. यात वाईट असे काही नाही. मात्र, हे जर वयाच्या पन्नाशीपूर्वी किंवा ऐन तारुण्यात घडू लागले तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले. लक्षणे जाणवू लागल्यानंतर पुरुषांनी अत्यंत हेल्दी डाएट (आरोग्यदायी आहार) घ्यायला पाहिजे. ज्यात तंतूमय पदार्थ (फायबर्स) अधिक असतील. याशिवाय नियमीत व्यायाम करणेही आवश्यक आहे. कमीत कमी आठ तास नियमीत झोपही घ्यायला हवी. ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवा.