Makar Sankranti 2022: तीळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या तीळ खाण्याचे महत्व
त्या पदार्थाची आठवण काढली की त्याचाशी जोडलेला सण आपसूकच डोळ्यासमोर येऊन उभा राहतो. तीळ म्हंटल की मकर संक्रांती डोळ्यासमोर येते.
प्रत्येक सण एका विशिष्ट खाद्यपदार्थांशी जोडलेला आहे. त्या पदार्थाची आठवण काढली की त्याचाशी जोडलेला सण आपसूकच डोळ्यासमोर येऊन उभा राहतो. तीळ म्हंटल की मकर संक्रांती डोळ्यासमोर येते. 'तीळ गूळ घ्या गोड बोला' असं म्हणतं संक्रांतीच्या दिवशी तिळाच्या वड्या किंवा लाडू आपण वाटतो, पण तिळाचे फायदे तुम्हाला माहित आहे का? तीळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया तीळ खाण्याचे फायदे... (हेही वाचा, Bhogichi Bhaji Sankranti Special Recipe: भोगी निमित्त कशी कराल मिक्स भाजी आणि भाकरी; इथे पहा रेसिपी)
तीळ खाण्याचे फायदे-
1] तिळामध्ये तांबे ,मॅंगनीज ,कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी 1, बी 6 थायामिन फोलेट, नियासिन, मॉलिब्डेनम, सेलेनियम आणि झिंक या गोष्टी तिळामध्ये असतात.
२] तिळाच्या बियांमध्ये सेसमिन आणि सेसमोलिन हे दोन घटक असतात.
३] तीळ खाल्ल्याने मधुमेहापासून तुमचा बचाव होईल.
४] तिळामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत होतात
५] तीळ खाल्ल्याने कर्करोगाचा धोका देखील कमी होतो.
6] तीळ खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते.