गोवर,रुबेला लसीकरणास मदरशांचा विरोध, व्हॉट्सअॅपमधून परसरलेल्या अफवांमुळे पालकांत संभ्रम

गोवर, रुबेला लसीकरणास महाराष्ट्रातील मदरशांनी नकार दर्शवला होता. यात प्रामुख्याने कळवा, मुंब्रा परिसरातील गावांतील मदरसे तसेच, सोलापूरमधील काही शाळांनी लसीकरणास नकार दिला होता.

Measles Rubella Vaccination | ( Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Measles Rubella Vaccination: गोवर, रुबेला लसिकरणाबाबत केवळ महाराष्ट्राच नव्हे तर, इतरही राज्यांमध्ये अनेक गैरसमज आहेत. यात प्रामुख्याने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पसरवण्यात येणाऱ्या अफवांमुळे गोंधळ अधिकच वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या गोवर, रुबेला लसीकरणास अनेक पालकांनी नकार दर्शवला होता. अशाच प्रकारे आता उत्तर प्रदेशमध्येही नकार पाहायला मिळत आहे. खास करुन शेकडो मदरसे गोवर (Measles), रुबेला (Rubella) लसिरणास विरोध करत आहेत. जिल्हा लसीकरण अधिकारी विश्वास चौधरी यांनी माहिती देताना सांगितले की, मुस्लिम मुलांना नपुसंक बनवण्यासाठी सरकार या लसीच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्याचा एक संदेश व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. या सारखे अनेक संदेश व्हायरल झाले आहेत. त्यामुळे बरेच पालक आपल्या पाल्यांना गोवर, रुबेला लस देण्यासाठी नकार देत आहे. मात्र, ही लस पूर्णपणे सुरक्षीत आहे. नऊ महिने ते 15 वर्षांपर्यंतच्या बालकांना ही लस दयावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागाकडून देशभरात व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, उत्तर प्रदेशत मदरशांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. एकट्या एकट्या मेरठमध्येच 272मदरसे आहेत. यातील 70 मदरशांनी लसीकरणास विरोध दर्शवला आहे. हा विरोध इतका टोकाचा आहे की, काही मदरशांनी तर, लसिकरणादिवशी मदरशांमध्येच येऊ नका असे मुलांना सांगितले आहे. लोकांच्या मनातील संभ्रम आणि गैरसमज दूर करण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. सहारनपूरचे चीफ मेडिकल ऑफीसर डॉ. बी.एस.सोढी यांनी सांगितले की, लोकांच्या मानातील गैरसमज दूर व्हावा. यासाठी आरोग्य विभागाने एक जागृती मोहीमच हाती घेतली आहे. (हेही वाचा, गोवर-रुबेला लस टोचल्यानंतर पुण्यात 8 वर्षीय मुलीची तब्येत बिघडली, ससून हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये उपचार सुरु)

दरम्यान, महाराष्ट्रातही या आधी असाच प्रकार घडला होता. गोवर, रुबेला लसीकरणास महाराष्ट्रातील मदरशांनी नकार दर्शवला होता. यात प्रामुख्याने कळवा, मुंब्रा परिसरातील गावांतील मदरसे तसेच, सोलापूरमधील काही शाळांनी लसीकरणास नकार दिला होता. अखेर आरोग्य विभागाने जनजागृती केल्यावर हा विरोध मावळला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif