Lung Cancer Awareness Month : 'ही' लक्षणे देतात फुफ्फुसाच्या कॅन्सरचा संकेत !
म्हणून या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.
नोव्हेंबर महिना हा 'लंग कॅन्सर अवेअरनेस मंथ' म्हणून साजरा केला जातो. लंग कॅन्सर म्हणजे फुफ्फुसांचा कॅन्सर. वर्ल्ड हेल्थ ऑरगनायजेशनने केलेल्या सर्वेक्षणानुसार, जगातील सुमारे 7.6 मिलियन लोकांचा मृत्यू फुफ्फुसाच्या कॅन्सरने होतो. याचे प्रमुख लक्षण म्हणजे खोकला. उपचार करुनही खोकला कायम राहत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
धुम्रपान, मद्यपान करणाऱ्यांना कॅन्सरचा धोका अधिक असतो. मात्र कॅन्सरचे निदान लवकर झाल्यास त्यावर उपचार करणे शक्य होते. म्हणून या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.
# श्वास घेताना शिट्टीसारखा आवाज येत असल्यास लगेचच डॉक्टरांशी संपर्क करा. हा आवाज अनेक आजारांबरोबर आरोग्याच्या इतर अनेक समस्यांचा संकेत देतो.
# छातीत काही पदार्थ जमा झाल्याने दीर्घ, खोलवर श्वास घेण्यास त्रास होतो. हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचे लक्षण आहे.
# चेहरा, गळ्यावरील सूज येत असल्याचे हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचे लक्षण आहे, हे ओळखावे. त्यामुळे असे काही लक्षण आढळल्यास ताबडतोब डॉक्टारांचा सल्ला घ्या.
# कॅन्सर वाढल्यास शरीरातील सांधे, पाठ, कंबर आणि इतर भागांत वेदना जाणवू लागतात. काही वेळेस तर हाडे देखील फ्रॅक्चर होऊ शकतात.
# छातीबरोबरच पाठ, खांद्यातही वेदना जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका.
# छातीतील कफ 2-3 आठवड्यापर्यंत जात नसल्यास किंवा कफाद्वारे रक्त पडत असल्यास लगेच तपासण्या करुन घ्या.
# फुफ्फुसाच्या कॅन्सरचा परिणाम डोक्यावरही होऊ शकतो. अशावेळी डोकेदुखी सातत्याने जाणवते. कारण ट्युमरमुळे डोक्याला रक्तपुरवठा करणाऱ्या नसांवर देखील परिणाम होऊ शकतो.
# अनेकदा शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढल्याने देखील रक्तसंचय होऊ लागतो. हे देखील कॅन्सरचे लक्षण आहे.