Lung Cancer Awareness Month : फळे, भाज्या खा ; फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका टाळा
कॅन्सर होण्यास तुमची जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या सवयी यांसारख्या अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात.
नोव्हेंबर महिना हा 'लंग कॅन्सर अवेअरनेस मंथ' म्हणून साजरा केला जातो. जे लोक अधिक धुम्रपान करतात त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. कॅन्सर होण्यास तुमची जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या सवयी यांसारख्या अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. आहारात फळे, भाज्या यांचा समावेश केल्यास कॅन्सरचा धोका टाळता येतो. 'ही' लक्षणे देतात फुफ्फुसाच्या कॅन्सरचा संकेत !
नेदरलँडमधील इंस्टीट्यूट फॉर पब्लिक हेल्थ अँण्ड इन्वाअरमेंटमध्ये झालेल्या संशोधनानुसार, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, फळे खाल्याने फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होऊ शकतो. त्याचबरोबर धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना देखील ही फळे, भाज्या खाल्यास फायदा मिळतो.
धुम्रपान टाळणे हा कॅन्सर रोखण्याच्या सर्वात प्रभावशाली मार्ग आहे. कॅन्सर एपिडेमायलॉजी, बायोमार्कर्स अँण्ड प्रिव्हेंशन नावाच्या जर्नलमध्ये कॅन्सर आणि न्यूट्रिशनवर आधारीत अभ्यासात असे दिसून आले की, 452,187 लोकांपैकी 1600 लोक कॅन्सरने ग्रस्त आहेत.
आहारात फळे व भाज्या यांचा समावेश केल्याने एका ठराविक मर्यादेपर्यंत फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.