Lockdown: कंडोम घ्या मगच Quarantine सेंटरमधून घरी जा; बिहारमधल्या आरोग्य विभागाचा उपक्रम

या सर्व मजूरांना आम्ही लोकसंख्या नियंत्रणाबाबत माहिती देत असून, मगच घरी पाठवत आहे. मात्र, कंडोम वाटप आणि कोविड 19 याचा काहीही संबंध नाही

Condom | (Photo Credits: Pixabay | Archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे देशभरात लॉकडाऊन (Lockdown) सुरु आहे. अशा काळात स्थलांतरीत झालेल्या नागरिकांना क्वारंटाइन (Quarantine) सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. दरम्यान, क्वारंटीन (Quarantine) कालावधी पूर्ण करुन घरी परतणाऱ्या नागरिकांना कंडोम वाटप केले जात आहे. बिहारच्या आरोग्य मंत्रालयाच्या कुटुंब कल्याण विभाद्वारे हा उपक्रम राबवला जात आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून त्या नागरिकांना खास करुन स्थलांतरित कामगारांना 14 दिवसांचा क्वारंटीन कालावधी पूर्ण केल्यानंतर 14 देऊन घरी पाठवण्यात येत आहे.

आयएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बिहारमध्ये सुमारे 14 लाख 3 हजार 576 लोक क्वारंटीन सेंटरमध्ये राहिले आहेत. ज्यात 8 लाख 76 हजार 808 लोकांनी क्वारंटीन कालावधी पूर्ण केला आहे व ते आपल्या घरी गेले आहेत. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, स्थलांतरीत मजूर क्वारंटीन सेंटरमध्ये राहून घरी जात आहेत. या सर्व मजूरांना आम्ही लोकसंख्या नियंत्रणाबाबत माहिती देत असून, मगच घरी पाठवत आहे. मात्र, कंडोम वाटप आणि कोविड 19 याचा काहीही संबंध नाही, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. (हेही वाचा, Pregnancy Tips: तुम्ही गरोदर आहात की नाही हे पाहण्यासाठी करून पाहा 'हे' घरगुती उपाय)

या अधिकाऱ्याने थेट सांगितले की, या उपक्रमाचा कोविड 19 सोबत काहीही संबंध नाही. हा कुटुंब कल्याण आणि लोकसंख्या नियंत्रण यासाठी राबवलेला कार्यक्रम आहे. ज्यात केअर इंडिया विभाग आपले योगदान देत आहे. केयर इंडियाचे व्यवस्थापन समन्वयक अमित कुमार यांनी सांगितले की, डोअर टू डोअर आरोग्य परिक्षणादरम्यान, पोलिओ अभियानच्या सूपरवायजरकडून स्थलांतरीत कामगारांना माहिती दिली जात आहे. तसेच. योग्य लाभार्थ्यांना जीवनावश्यक साहित्याचाही पुरवठा केला जात आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आरोग्य विभागाद्वारे क्वारंटीन सेंटरमध्ये प्रति व्यक्ती कंडोमची 2 पाकीटं दिली जात आहेत. काही जिल्ह्यांमध्ये गर्भनिरोधकांचेही वितरण केले जात आहे. क्वारंटीन सेंटर जोपर्यंत सुरु असतील तोपर्यंत हा कंटोम वाटप उपक्रम सुरुच राहील असेही अमित कुमार यांनी सांगितले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif