IPL Auction 2025 Live

Vat Purnima 2020: वटपौर्णिमा सणानिमित्त जाणून घ्या वड वृक्षाचे आरोग्यदायी फायदे

या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करतात. वडाचं झाडं आपल्या अनेक पिढ्यांना वर्षोनवर्षे सावली देते. वडाच्या झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे वटपौर्णिमेलादेखील वडाच्या झाडाची पूजा केली जाते. या झाडाचे आपल्या आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. आज या लेखातून आपण वडाच्या झाडाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

Banyan Tree (PC-Wikimedia Commons)

Vat Purnima 2020: महाराष्ट्रात 5 जून म्हणजेचं उद्या वटपौर्णिमेचा सण साजरा होणार आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करतात. वडाचं झाडं आपल्या अनेक पिढ्यांना वर्षोनवर्षे सावली देते. वडाच्या झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे वटपौर्णिमेलादेखील वडाच्या झाडाची पूजा केली जाते. या झाडाचे आपल्या आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. आज या लेखातून आपण वडाच्या झाडाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

वड हा भारतीय उपखंडामध्ये आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. वडाचे वृक्ष सर्वसाधारणपणे 15 ते 20 मीटर उंच वाढतो. वडाच्या पानाचा उपयोग जेवणासाठी पत्रावळींसाठी करतात. तसेच वडाची मुळे, पाने, फुले आणि चीक, साल या सर्वांचा औषध म्हणून उपयोग करतात. वडाच्या पारंब्या शिकेकाईमध्ये घालून पाणी उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास, केसांची वाढ होते. (हेही वाचा - Vat Purnima 2020 Rangoli Design: वटपौर्णिमा सणानिमित्त 'या' खास रांगोळी डिझाईन्स काढून वाढवा तुमच्या अंगणाची शोभा!)

वडाचे आरोग्यदायी फायदे -

केसांच्या समस्यांवर वडाचे झाडं रामबाण उपाय आहे. वडाच्या पानांची राख करून त्यात लीनसीड ऑईल मिक्स करा. हे मिश्रण डोक्याला लावा आणि मसाज करा. यामुळे केसगळतीची समस्या दूर होईल. तसेच वडाची मऊ पानं घ्या. ती व्यवस्थित वाटून घ्या. त्यामध्ये मोहरीचं तेल घाला. हे मिश्रण तेलात व्यवस्थित उकळून घ्या. हे मिश्रण थंड करून केसांना लावा. केसांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी हा रामबाण उपाय आहे.