Modi Government Covid Advisory: भारतात आढळला JN.1 विषाणूचा पहिला रुग्ण,कोविड-19 रुग्णांध्येही वाढ; केंद्राकडून राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

Health | Pixabay.com

JN.1 variant in India: देशातील काही राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड-19 चे रुग्ण वाढल्याचे आणि जे एन वन (JN.1) नावाच्या नव्या विषाणूचा प्रकार आढलून आल्याचे पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव सुधांशू पंत यांच्यादावारे केंद्राने राज्यांना पाठवलेल्या पत्रात राज्यांनी संभाव्य धोका विचारात घेता करावयाच्या उपाययोजना आणि सावधगिरी यांबाबत मार्गदर्शक सूचना (Modi Government Covid Advisory) केल्या आहेत. या पत्रात प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्याच्या बदलत्या परिस्थितीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रमुख धोरणे आणि शिफारशींची रूपरेषा देण्यात आली आहे.

केंद्राकडून राज्यांना मार्गदर्शक तत्वांबाबत पत्र

आवश्यक दक्षता: सुधांश पंत यांनी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील सहयोगी प्रयत्नांवर भर देत म्हटले की, संसर्गाचा दर कमी असूनही सतत दक्षता बाळगणे आवश्यक आहे. विषाणूचा प्रभाव आणि त्याचे स्वरुप अद्याप निटसे पुढे आले नसले तरी त्याच्या बदलत्या घडामोडी आणि महामारीच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे. (हेही वाचा, Karnataka’s Mask Advisory: कोरोना रिटर्न्स!! केरळमध्ये कोरोना प्रकरणे वाढल्याने कर्नाटकात ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आला मास्क लावण्याचा सल्ला)

सणासुदीच्या काळात सतर्कता: सणासुदीचा हंगाम जवळ येत असताना, वाढत्या संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक सार्वजनिक आरोग्य उपाय लागू करण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे. व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी श्वसन स्वच्छतेच्या पद्धतींचे पालन करणे आवश्यक असल्याचे या पत्रात म्हटले आहे. (हेही वाचा - New COVID Variant In India: चीन आणि अमेरिकेनंतर आता भारतात आढळला कोरोनाचा नवीन JN.1 सबवेरियंट; काय आहेत लक्षण? जाणून घ्या)

मार्गदर्शक तत्त्वांचे पालन: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रदान केल्यानुसार, COVID-19 साठी आवश्यक आणि तपशीलवार परिचालन मार्गदर्शक तत्त्वांचे प्रभावी पालन करण्यासाठी राज्यांना आवाहन करण्यात आले.

देखरेख आणि अहवाल: अनेक राज्यांना इन्फ्लूएंझा सारखा आजार (ILI) आणि गंभीर तीव्र श्वसन आजार (SARI) यांची संख्या वाढत असल्याने त्याची जिल्हावार नोंद करणे आवश्यक आहे. तसेच, रुग्णांच्या संख्या, लक्षणे यांनुसार आरोग्य सुविधांमध्ये सक्रियपणे निरीक्षण आणि अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या. ही माहिती इंटिग्रेटेड हेल्थ इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म (IHIP) पोर्टलवर नियमितपणे अद्ययावत केली जावी जेणेकरून रुग्णांमध्ये लवकर वाढणारे ट्रेंड शोधले जातील, असेही अवाहन या पत्रात करण्या आले आहे.

चाचणी प्रोटोकॉल: कोविड-19 चाचणी मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने सर्व जिल्ह्यांमध्ये पुरेशी चाचणी सुनिश्चित करणे, आरटी-पीसीआर आणि अँटीजेन चाचण्यांमध्ये शिफारस केलेले संतुलन राखणे आणि आरटी-पीसीआर चाचण्यांच्या वाढीव वापरास प्रोत्साहन देणे या महत्त्वाच्या धोरणांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

जीनोम सिक्वेन्सिंग: भारतीय SARS COV-2 जेनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) प्रयोगशाळांना सकारात्मक नमुने पाठवून जीनोम अनुक्रम तीव्र करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन देण्यात आले. JN.1 व्हेरियंटसह नवीन रूपे वेळेवर शोधणे सक्षम करणे हे या सक्रिय उपायाचे उद्दिष्ट आहे.

क्षमता मूल्यांकन: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या ड्रिलमध्ये सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सुविधांच्या सक्रिय सहभागावर भर देण्यात आला. हा उपक्रम त्यांच्या तयारी आणि प्रतिसाद क्षमतेचे मूल्यांकन सुनिश्चित करतो.

एक्स पोस्ट

सामुदायिक जागरूकता: शेवटी, राज्यांना कोविड-19 चे व्यवस्थापन करण्यासाठी सतत सार्वजनिक पाठिंबा मिळवण्यासाठी समूहिक जागरूकता वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, समुदायामध्ये श्वसन स्वच्छतेच्या पद्धतींना बळकटी देण्यावर भर देण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif