Cervical Cancer Vaccine: सीरम इंन्स्टिट्यूट गर्भाशयाच्या कर्करोगावरील पहिली स्वदेशी लस आज लॉंच करणार

भारतातचं सीरम इंन्स्टिट्यूट गर्भाशयाच्या कर्करोगावरील पहिली स्वदेशी लस आज लॉंच करणार आहे.

Adar Poonawalla | (Photo Credits-Facebook)

भारतात दरवर्षी कर्करोग (Cancer) ग्रस्त रुग्णांची संख्या वाढताना दिसते. त्यात कर्करोगाचा आजार उद्भवणाऱ्या महिलांची (Female) संख्या अधिक आहे. महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर ब्रेस्ट कर्करोग (Breast Cancer) किंवा गर्भाशयाच्या कर्करोग (Cervical Cancer) ग्रस्त महिला दिसून येतात. साधारण महिला कायमच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि जेव्हा त्या तपासणीसाठी जातात तेव्हा मात्र वेळ निघून गेले ली असते. दरवर्षी कर्करोगामूळे (Cancer) अनेक महिलांचा मृत्यू होतो त्यात गर्भाशयाच्या कर्करोगामुळे मृत्यू होणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. गर्भाशयाच्या कर्करोगावर परदेशात उपाय उपलब्ध होते पण सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नव्हते. परदेशी उपचार घेण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत होती. म्हणून आता भारतातचं सीरम इंन्स्टिट्यूट (Serum Institute) गर्भाशयाच्या कर्करोगावरील पहिली स्वदेशी लस आज लॉंच करणार आहे.

 

गर्भाशय कर्करोगाच्या रुग्णांसाठी (Cervical Cancer Patients) सीरम इन्स्टिट्यूटनं 'क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' ही स्वदेशी लस विकसित केली असून सीरम इन्स्टिट्यूट आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी (Department Of Biotechnology) आज ही लस लॉंच (Vaccine Launch) करणार आहे. सध्या या आजारावरील प्रभावी लस भारत परदेशातून आयात करतो. त्यामुळे त्यासाठी जास्त खर्च येतो. आता ही लस देशातच उपलब्ध झाल्यामुळे लसीवरील खर्च कमी होऊन रुग्णांना अगदी सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. (DCGI) ने अलीकडेच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला गर्भाशयाच्या कर्करोगावरील प्रभावी लस (Vaccine) तयार करण्यास परवानगी दिली आहे तरी त्याचा पाठपुरावा करत सिरम इन्स्टिट्यूट आज ही लस लॉंच करत आहेत. (हे ही वाचा:-)

 

गर्भाशयाच्या कर्करोगावरील लसीबरोबरचं (Cervical Cancer Vaccine) ओमायक्रॉन व्हेरियंटवर (Omicron Varient) लस (Vaccine) विकसित करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट काम करत असून या वर्षाच्या अखेरपर्यंत ही लस भारतीय बाजारात येणार आहे. भारतात विकसित होणारी लस ही बूस्टर लसीच्या (Booster Dose) रुपात घेतल्यास ती प्रभावी ठरेल असं अदर पुनावाला (Adar Poonawala) म्हणाले. तसेच सध्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये मंकीपॉक्सच्या (Monkeypox Vaccine) लसीवर संशोधनास सुरुवात झाली आहे आणि गरज पडल्यास कोरोना (Corona) पाठोपाठ मंकीपोक्सची लस देखील आम्ही घेवून येवू, अशी माहिती आदन पूनावाला यांनी दिली आहे.