Lipid Guidelines in India: भारतामध्ये पहिल्यांदाच 'लिपिड गाईडलाईन्स' जारी; High cholesterol हा सायलंट किलर!
CSI ने केलेल्या अभ्यासानुसार, low levels of HDL-cholesterol (good cholesterol) हे देशभरात सार्याच राज्यांमध्ये दिसले आहे याला राजस्थान, गुजरात, तेलंगणा, मणिपूर अपवाद आहे. तर high LDL-cholesterol (bad cholesterol) चे रूग्ण उत्तर भारतात, केरळ आणि गोवा मध्ये आहे.
आजकाल जीवन धकाधकीचं आणि ताणतणावाचं अधिक झाल्याने कमी वयातही अकाली मृत्यूने गाठल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. High Cholesterol हा देखील असाच एक प्रकार आहे. कोलेस्ट्रोलचं प्रमाण शरीरात वाढणं आणि त्यामुळे मृत्यू ओढावणं हा प्रकार आता केवळ लठ्ठ लोकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. भारताकडून पहिल्यांदाच high cholesterol असलेल्या लोकांसाठी खास गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.
जगभरात Cardiologists कडून 2019 guidelines by the European Society of Cardiology यांचं अवलंबन केले जात असे. मात्र आता Cardiolgocial Society of India ने त्यांच्या 22 सदस्यांसह पहिल्यांदाच देशातील dyslipidemia अर्थात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढलेल्यांसाठी नियमावली दिली आहे. Guidelines For Quitting Tobacco: तंबाखू सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लाखो लोकांना दिलासा; WHO ने जारी केली नवीन मार्गदर्शक तत्त्वे .
dyslipidemia ही एक मेडिकल कंडिशन आहे. ज्यामध्ये रक्तात लिपिड म्हणजेच फॅट्सचं प्रमाण वाढलेले दिसलं. त्यालाच high cholesterol किंवा triglycerides म्हणतात. या वाढलेल्या फॅट्समुळे हृद्याचे आजार, स्ट्रोक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. मात्र शरीरातील हा वाढलेला इम्बॅलन्स योग्य आहार, व्यायाम आणि औषधांच्या मदतीने ठीक केला जाऊ शकतो.
Dyslipidemia हा सायलंट किलर म्हणून पाहिला जातो. त्याची लक्षणं नाहीत. पण यामुळे हृद्याशी निगडीत आजार वाढू शकतात. ज्यात हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि peripheral artery disease चा समावेश आहे.
तुमचं लिपिड प्रोफाईल कसं जाणून घ्याल ?
लिपिड प्रोफाईल साठी साधी रक्ताची चाचणी असते. यामध्ये रक्तातील फॅट्सच्या प्रमाणावरून low-density lipoprotein (LDL), high-density lipoprotein (HDL),आणि portion of triglycerides याची माहिती मिळू शकते.
गाईडलाईन्स नुसार, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण किमान 100 mg/DL (milligrams of sugar per decilitre)पेक्षा कमी असावं. भारतामध्ये शहरी भागात अनेकजण high cholesterol च्या विळख्यात आहेत. ज्यांच्यामध्ये high triglycerides चे प्रमाण 150 mg/dl पेक्षा जास्त आहे त्यांना लाईफस्टाईल मध्ये बदल करणं आणि तातडीने विशेष उपचार सुरू करण्याची गरज आहे.
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचे (CVD) अधिक रूग्ण आणि CVD मुळे जगात सर्वाधिक अकाली मृत्यूचे प्रमाण भारतात कसे आहे हे पाहिल्यानंतर देशभरातील डॉक्टरांनी लिपिड मार्गदर्शक तत्त्व समोर आणली आहेत.
CSI ने केलेल्या अभ्यासानुसार, low levels of HDL-cholesterol (good cholesterol) हे देशभरात सार्याच राज्यांमध्ये दिसले आहे याला राजस्थान, गुजरात, तेलंगणा, मणिपूर अपवाद आहे. तर high LDL-cholesterol (bad cholesterol) चे रूग्ण उत्तर भारतात, केरळ आणि गोवा मध्ये आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)