IPL Auction 2025 Live

New COVID-19 Variant 'IHU': फ्रांस मध्ये आढळलेल्या Omicron पेक्षाही वेगाने पसणार्‍या नव्या व्हेरिएंट बद्दल जाणून घ्या सर्वकाही!

संशोधकांनी सध्या दिलेल्या माहितीनुसार IHU variant हा variant of concern ठरतोय की नाही हे वेळचं सांगू शकणार आहे.

COVID-19 new variant. Image used for representational purpose only. (Photo Credits: Pixabay)

जगभरामध्ये सध्या ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) धुमाकूळ घालत असताना वाढती रूग्णसंख्या चिंतेचा विषय बनलेला असताना वैज्ञानिकांना 'IHU'हा नवा व्हेरिएंट देखील सापडला आहे. कोविड 19 च्या या नव्या व्हेरिएंटला तात्पुरते 'IHU' असं नाव देण्यात आलेले आहे. नवा व्हेरिएंट देखील म्युटेट असून ओमिक्रॉन व्हेरिएंट पेक्षा अधिक वेगाने तो पसरत आहे असे सांगण्यात आले आहे.  29 डिसेंबरला जारी करण्यात आलेल्या पेपर मध्ये या व्हेरिएंट बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. Eric Feigl-Ding यांनी एका लांब थ्रेड द्वारा 3 जानेवारीला याची माहिती दिली आहे. SARS-CoV-2 variant च्या स्पाईक प्रोटीन मध्ये N501Y आणि E484K या दोन्ही सब्स्टिट्युशनचा समावेश आहे. त्यामुळे कोविड 19 आजाराचा धोका बळावून हा व्हायरस लसीसमोर देखील प्रभावी ठरू शकतो.  हे देखील वाचा: IHU New Covid-19 Variant: जगात ओमिक्रोनचा धोका वाढत असताना फ्रान्समध्ये नव्या विषाणूचा शोध, IHU ठरतोय अधिक घातक .

जाणून घ्या 'IHU' या फ्रान्स मध्ये आढळलेल्या नव्या व्हेरिएंट बद्दल

संशोधकांनी सध्या दिलेल्या माहितीनुसार IHU variant हा variant of concern ठरतोय की नाही हे वेळचं सांगू शकणार आहे. महामारीविज्ञानतज्ञांनी नव्या व्हेरिएंट मध्ये यापूर्वीच माहिती दिलेली होती. 2022 मध्ये हा येईल असा अंदाज होता. हा म्युटेट होऊन जगभरातील महामारीचं रूप बदलेल असा अंदाज आहे.