वजन कमी करण्याच्या स्पर्धेत 'हे' आहेत ट्रेंडिग डाएट
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी विविध मार्गांचा वापर सुद्धा सर्रास केला जातो. मात्र वजनावर नियंत्रण मिळवण्याचा एक सहज आणि सोपा मार्ग म्हणजे आपण दिवसभरात कोणत्या पदार्थांचे सेवन करतो हे महत्वाचे आहे.
सध्याचे बदलते राहणीमान पाहता लहानांपासून ते वयस्कर लोकांमध्ये वजन वाढल्याचे प्रमाण अधिक दिसून येते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी विविध मार्गांचा वापर सुद्धा सर्रास केला जातो. मात्र वजनावर नियंत्रण मिळवण्याचा एक सहज आणि सोपा मार्ग म्हणजे आपण दिवसभरात कोणत्या पदार्थांचे सेवन करतो हे महत्वाचे आहे. तसेच आपण जे पदार्थ खातो ते आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरतात हे सुद्धा पहाणे तितकेच प्रामुख्याने पाहिले पाहिजे. महिला आणि पुरुषांमध्ये वजन वाढल्याचे दिसून आल्यास ते जिम लावणे किंवा एखादे डाएट फॉलो करण्यास सुरुवात करतात.
तसेच बॉलिवूड सेलिब्रिटीची फिगर पाहून सुद्धा काही जणांना त्यांच्या सारखे आपले ही लवचीक आणि तंदुरुस्त आरोग्य असावे असे वाटते. त्यामुळे वाढलेले वजन हे आजकाल प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीची समस्या बनून राहिली आहे. मात्र जर तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास 'हे' काही ट्रेंडिग डाएट पद्धती तुम्ही फॉलो करु शकतात.
>>बेबी फूड डाएट
या प्रकारच्या डाएट मध्ये लोक समान्य जेवणाच्या ऐवजी बेबी फूड म्हणजेच लहान मुलांचे जेवण जेवतात. हे बेबी फूड नाश्ता म्हणून तुम्ही खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.
>> गडद रंगाच्या ताटाच जेवणे
गडद रंगाच्या ताटात जेवल्यास लवकर भूक लागत नाही. डाएट फॉलो करणाऱ्यांच्या मते, फिक्या रंगाच्या ताटात लोक भरपूर जेवण करतात. त्या उलट गडद रंगाच्या ताटात कमी जेवण घेतले तरीही ते जास्त असल्याचे दिसते.(लहान मुलांमध्ये अतिलठ्ठपणा का दिसतो? जाणून घ्या कारणे)
>>आरश्यासमोर बसून जेवणे
आरश्यासमोर बसून स्वत:ला जेवताना पाहणे हे जरा विचित्रच आहे. पण डाएट फॉलो करणाऱ्यांचे याबाबत थोडे वेगळे मत असून आरश्यासमोर बसून जेवल्याने आपण किती प्रमाणात जेवत आहोत ते कळून येते. त्यामुळेच खाण्यावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.
तसेच प्रत्येक डाएटीशन यांच्याकडून डाएट फॉलो करण्यास सुरुवात करण्यापूर्वी सलाडचा वापर आहारात जास्त असावा असा सल्ला दिला जातो. कारण रॉ फूड डाएटमध्ये प्लांट बेस्ड म्हणजेच झाडाला लागणाऱ्या फळ आणि भाज्या यांचा समावेश केला जातो. तसेच फळ भाज्या किंवा पालेभाज्यांमधून मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे मिळत असल्याने ते आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. तर तुम्ही सुद्धा वरील ट्रेन्डिंग डाएट फॉलो करुन तुमचे वजन कमी करु शकता.