ऑक्टोबर हिट च्या तडाख्यातून वाचण्यासाठी अशी घ्या त्वचेची काळजी
आपली त्वचा चांगली आणि चमकदार राहावी म्हणून अनेक महिला बाजारात मिळणारे अनेक उत्पादने वापरत असतात. ऑक्टोबर हिटमध्येही आपली त्वचा छान राहावी म्हणून काही महत्त्वाच्या टिप्स:
ऑक्टोबर हिट (October Heat) हा मे महिन्यासारखा अंगाची लाहीलाही करणारा नसला तरी अंगाला झोंबणारा असतो. या महिन्यात ऊन आणि थंडी हे दोन्ही ऋतू अनुभवायला मिळतात. या ऑक्टोबरच्या महिन्यात दिवसा ऊन तरी रात्री वातावरणात गारवा निर्माण होतो. ऑक्टोबर हिट हा उन्हाळ्याप्रमाणे वाटत नसला तरीही त्याचे परिणाम आपल्या शरीरावर तसेच त्वचेवर जाणवतात. कारण ऑक्टोबर हिट हा त्वचेला झोंबणारा असा महिना असतो. त्यामुळे आपल्या कोमल त्वचेवर त्याचा विपरित परिणाम होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
प्रत्येकाला विशेष करुन स्त्रियांना आपली त्वचा खूप प्रिय असते. आपली त्वचा चांगली आणि चमकदार राहावी म्हणून अनेक महिला बाजारात मिळणारे अनेक उत्पादने वापरत असतात. ऑक्टोबर हिटमध्येही आपली त्वचा छान राहावी म्हणून काही महत्त्वाच्या टिप्स:
1) तेलकट त्वचा असणाऱ्यांनी आठवड्यातून एकदा तरी चेह-यावर वाफ घ्यावी. यामुळे त्वचेत वाजवी पेक्षा जास्त असणारे तेल कमी होते. त्वचेच्या छिद्रांत साठणारा तेलकटपणा कमी होण्यास मदत होते.
2) तेलकट त्वचा असणाऱ्यांनी आहाराकडे विशेष लक्ष द्यावे म्हणजे चरबी, स्टार्च असणारे पदार्थ, गोड, मसालेदार, तेलकट, चमचमीत, झणझणीत, तुपकट पदार्थ टाळावेत.
हेदेखील वाचा- त्वचा ब्लिच करण्यासाठी '6' घरगुती पर्याय!
3) याखेरीज रंगीत भडक सौंदर्य प्रसाधनांचा वापर टाळावा. यात असलेल्या रंगीत घातक रासायनिक पदार्थांनी त्वचेला अपाय होऊ शकतो.
4) त्वचेवरील अनावश्यक तेल कमी करण्यासाठी लेप किंवा फेसपॅकचा वापर करावा.
5) चेहऱ्यावर साबणाचा अतिरेक टाळावा. त्याऐवजी डाळीचे पीठ,दुध,सायाबरोबर लावावे.
6) दिवसभरातून 4-5 वेळा थंड पाण्याने तोंड स्वच्छ धुवावे.
7) त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी रात्रीचे जागरण न करता ताण-तणाव टाळावा.
8) त्वचा कोरडी असणाऱ्या स्रियांनी कडक उन्हापासून व कडाक्याच्या थंडी पासून त्वचेचे सरंक्षण करावे. कडकडीत गरम पाण्याने आंघोळ करू नये.
10) साबण लावायचा असेल तर ग्लिसरीनयुक्त साबण निवडावा. अशाप्रकरे निगा घेऊन त्वचेचा रुक्षपणा घालवून त्वचेत तजेला आणू शकता.
या टीप्सच्या आधारावर ऑक्टोबर हीटचा सामना करु शकाल. हे सर्व नैसर्गिक उपाय असल्याने शरीरावर याचा विपरित परिणामही होणार नाही.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)