Heart Attack Death Rate in Women: हार्ट अटॅक पुरूषांच्या तुलनेत महिलांसाठी दुप्पटीपेक्षा अधिक जीवघेणा; 'ही' कारणं आहेत धोक्याची घंटा

पुरूषांच्या तुलनेत महिलांना उतारवयात हार्ट अटॅक येत असल्याने त्यांची प्रकृती अनेकदा ढासळलेल्या अवस्थेमध्ये असते.

Heart Health | Pixabay.com

हार्ट अ‍टॅक (Heart Attack)  मुळे मृत्यू हा केवळ आता वृद्धांमध्ये किंवा व्यसनाधीन व्यक्तींपुरता मर्यादित राहिलेला नाही. अनेक तरूण मंडळी देखील हृद्यविकाराच्या विळख्यामध्ये येत आहेत. अशातच आता पोर्तुगाल मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासामधून समोर आलेल्या अहवालानुसार, हार्ट अटॅक मध्ये मृत्यूचं प्रमाण पुरूषांच्या तुलनेत स्त्रीयांमध्ये दुप्पटीपेक्षा जास्त आहे. युके मध्ये हार्टअटॅक मुळे 30 हजार पेक्षा जास्त महिला एका वर्षात भरती झालेल्या आहेत.

Mail Online च्या वृत्तानुसार, 884 रूग्णांच्या आरोग्याची माहिती घेऊन सादर करण्यात आलेल्या अहवालामध्ये महिला आणि पुरूष दोघांचाही समावेश करण्यात आला आहे. हे रूग्ण गंभीर स्वरूपाच्या हार्ट अटॅकचे बळी पडले होते. ST segment elevation myocardial infarction (STEMI)असं या हार्ट अटॅकच्या स्वरूपाला म्हणतात. ज्यामध्ये कोरोनरी धमन्या पूर्णपणे ब्लॉक असतात. दीर्घकाळासाठी हृद्याला होणारा रक्तपुरवठा खंडीत राहतो.या रूग्णांना अ‍ॅन्जिओप्लास्टीच्या माध्यमातून धमनी वाढवून स्टेंट टाकून रक्तप्रवाह मोकळा केला जातो. त्यांची लक्षणे सुरू झाल्याच्या 48 तासांच्या आत, आणि त्यांचा मृत्यू दर पाहण्यासाठी अभ्यास करण्यात आला आहे.

Heart Failure 2023, च्या निकालात दिलेल्या माहितीनुसार, scientific congress of the European Society of Cardiology, ने 30 दिवसांत महिलांच्या मृत्यूचं प्रमाण 2.8 वेळेस अधिक असल्याचं म्हटलं आहे. येथे पुरूषांच्या मृत्यूचं प्रमाण 4.6% आहे त्याच्या तुलनेत महिलांच्या मृत्यूचं प्रमाण 11.8% आहे.

पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये मृत्यूचं प्रमाण अधिक असण्यामागे अजून एक कारण म्हणजे महिलांना हार्ट अटॅक येणं हे उतारवयात असल्याने त्यांची प्रकृती देखील ढासळलेली असते. British Heart Foundation च्या माहितीनुसार, युके मध्ये अनेक महिलांच्या आरोग्याचं निदान देखील चूकीचे झालेले असते. तसेच त्यांना वेळेवर मदत देखील मिळत नाही. त्यामुळे कमी वेळेतच दुसरा हार्ट येण्याचा देखील धोका संभवतो. Energy Drink Causes:रोज दोन लिटर एनर्जी ड्रिंक पिल्यामुळे तरुणाला होतोय हृदयविकाराचा त्रास, मूत्रपिंडही झाले निकामी .

हार्ट अटॅक मध्ये अचानक हृद्याला होणारा रक्तपुरवठा खंडीत होतो त्यामुळे हृद्य काम करणं बंद करते. यामध्ये छातीत दुखणं, श्वास कमी पडणं, धाप लागणं, कमजोर वाटणं अशी लक्षणं दिसतात.

हार्ट अटॅक हा कोरोनरी हार्ट डिसिज, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा धुम्रपानाची सवय यामुळे येतो.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif