Health Tips: सावधान! तुम्हाला मोजे घालून झोपण्याची सवय आहे? तर मग होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम
कान आणि पाय गरम ठेवण्यासाठी अनेक लोक मोजे पायात घालूनच झोपतात परंतु त्याचे असे काही तोटे देखील असू शकतात ज्याचा आम्ही कधी विचार ही केला नसेल.आजच्या लेखात आम्ही तुम्हाला मोजे घालून झोपल्याच्या दुष्परिणामांबद्दल सांगणार आहोत.चला तर मग जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती.
रात्री झोपताना मोजे घालून झोपल्यामुळे तुम्हाला खुप आरामदायक वाटत असेल.थंडीपासून बचावासाठी लोक आपली खास काळजी घेतात. शरीर गरम ठेवण्यासाठी लोक गरम कपडे घालतात. यावेळी कान आणि पाय गरम ठेवण्यासाठी अनेक लोक मोजे पायात घालूनच झोपतात परंतु त्याचे असे काही तोटे देखील असू शकतात ज्याचा आम्ही कधी विचार ही केला नसेल.आजच्या लेखात आम्ही तुम्हाला मोजे घालून झोपल्याच्या दुष्परिणामांबद्दल सांगणार आहोत.चला तर मग जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. (Health Benefits Of Isabgol: वजन कमी करण्यापासून ते एसिडिटी पासून सुटका होईपर्यंत अनेक आजरांवर उपयोगी आहे 'इसबगोल' ; जाणून घ्या गुणकारी फायदे )
उच्च रक्तदाबाचा धोका
झोपेच्या वेळी मोजे परिधान करणे रक्त परिसंचरण वाढविण्यासाठी ओळखले जाते, परंतु जर आपण जास्त काळ आपले मोजे घातले तर ते रक्त प्रवाह कमी करू शकते.
रक्ताभिसरणात अडथळा
मोजे घालून झोपल्याने आपले रक्ताभिसरण कमी वेगाने होते जे आपल्यासाठी घातक आहे. घट्ट मोजे घालून झोपल्यानेही असे होऊ शकते. यामुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रात्री झोपताना चुकूनही मोजे घालू नका.त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतोनायलॉन किंवा इतर साहित्याने बनविलेले मोजे परिधान करणे बरेच लोकांच्या त्वचेला सूट होत नाही, जर आपण जास्त काळ मोजे घातले तर संक्रमणाचा धोका वाढू शकतो. म्हणूनच, आपल्याला आपल्या त्वचेला अनुरूप मोजे निवडण्याची आवश्यकता आहे.
तापमान वाढण्याचा आणि इन्फेक्शनचा धोका
झोपताना मोजे घालणे किंवा खूप वेळ मोजे घातल्याने आपल्या शरीराचे तापमान वाढू शकते. पायांना घाम येऊ शकतो ज्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. सोबतच नियमित वापरासाठीही सुती मोजे घ्या जे आपल्या पायाला आलेला घाम शोषून घेतील आणि इन्फेक्शन होण्यापासून थांबवतील.
शांतपणे झोपणे कठीण होऊ शकते
घट्ट मोजे घालणे तुम्हाला खूप अस्वस्थ करू शकते, यामुळे याचा त्रास रात्री झोपताना देखील होतो. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही झोपायला मोजे घालावेत की नाही हे तुमच्या डॉक्टरांना विचारा.जर आपण चुकीचे मोजे घातले तर असे केल्यास त्वचेला त्रास होऊ शकतो.
हृदयावर होतो वाईट परिणाम
रात्री झोपताना मोजे घातल्याने पायाच्या नसांवर दबाव पडतो ज्यामुळे हृदयाला रक्त पंप करताना जास्त जोर लावावा लागतो. यामुळे हृदयावर परिणाम होतो. त्यामुळे रात्री झोपताना मोजे घालू नयेत.
(टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)