उकडीचे मोदक खाण्याचे आरोग्यदायी फायदे !

या फायद्यांसाठी नक्की मारा मोदकांवर ताव

उकडीचे मोदक (photo credits: Facebook )

उकडीचे मोदक हा केवळ गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य नव्हे, तर अनेकांसाठी उकडीचा मोदक पाहून त्यावर ताव मारण्याचा मोह आवरता येत नाही. गणपती बाप्पाचा कोणताच सण मोदकांशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे बाजारात इतर कोणत्याही स्वरूपात मोदक मिळत असले तरीही घरगुती उकडीचे मोदक गणेशोत्सवात नक्की केले जातात. गरमागरम उकडीचे मोदक अणि त्यावर साजूक तुपाची धार म्हणजे अहाहा ! मग डाएटच्या भीतीपोटी तुम्ही यंदा मोदकांपासून दूर राहत असाल तर हा सल्ला नक्की वाचा. कारण आरोग्याच्या दृष्टीनेही उकडीच्या मोदकांची चव चाखणं आरोग्याला फायदेशीर आहे.

उकडीच्या मोदक खाण्याचे फायदे  

वजन कमी करायचं मग गोड टाळा असा सल्ला दिला जातो पण मोदक त्याला अपवाद आहे.  मोदकामध्ये फॅट्स, आवश्यक पोषणद्रव्य मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी असतो. उकडीच्या मोदकाने पोट आणि मनही शांत राहण्यास मदत होते.

मोदक हा तांदूळ, खोबरं, गूळ यांच्या मिश्रणाने बनवलेला असतो. यावर तूपाची धार असते. त्यामुळे मोदकाचा ग्ल्यास्मिक इंडेक्स कमी असतो. उकडीच्या मोदकाचे प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये चढ - उतार होण्याचा धोका कमी असतो.

उकडीच्या मोदकामध्ये कोलेस्ट्रेरॉल कमी प्रमाणात असते. नारळ आणि सुकामेवा यामधील आरोग्यदायी घटक शरीरातील वाईट कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण कमी करतात आणि चांगले कोलेस्ट्रेरॉल वाढवतात.

नारळामधील काही घटक हृद्याचे आरोग्य जपण्यास मदत करतात. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही फायदेशीर ठरतात.

गुडघ्यांचे दुखणे कमी करण्यासाठी तूप हे प्रभावी औषध आहे. मोदकामध्ये तूपाचा समावेश असल्यास सांध्याच्या दुखण्याचे त्रास आणि आर्थ्राईटीसच्या समस्या  आटोक्यात ठेवण्यात मदत होते.

बद्धकोष्ठतेसारख्या समस्येचा त्रास कमी करण्यास उकडीचे मोदक फायदेशीर आहेत. मोदकातील पुरणामध्ये तूप असते. यामुळे आतड्यांजवळील घातक, टाकाऊ घटक बाहेर टाकण्यास मदत होते.