Summer Health Tips: उन्हाळ्यात सब्जा खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या
उष्णतेमुळे सर्वांनाचं आरोग्याच्या समस्या उद्धभवतात. उन्हामुळे उष्माघाताचा त्रास, उन्हाळे लागणे, अंगाववर घामोळे येणे, उष्णतेचे चट्टे अंगावर उठणे, तोंड येणे, कमी भुक, निद्रानाश, सनटॅन, लघवी करताना जळजळ, नाकातून आणि कानातून रक्त येणे, डोळ्यांची जळजळ, मुळव्याध अशा अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. परंतु, या सर्व समस्यांवर काही घरगुती उपचार करता येतात.
Summer Health Tips: सध्या सर्वत्र उन्हाची काहिली जाणवत आहे. उष्णतेमुळे सर्वांनाचं आरोग्याच्या समस्या उद्धभवतात. उन्हामुळे उष्माघाताचा त्रास, उन्हाळे लागणे, अंगाववर घामोळे येणे, उष्णतेचे चट्टे अंगावर उठणे, तोंड येणे, कमी भुक, निद्रानाश, सनटॅन, लघवी करताना जळजळ, नाकातून आणि कानातून रक्त येणे, डोळ्यांची जळजळ, मुळव्याध अशा अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. परंतु, या सर्व समस्यांवर काही घरगुती उपचार करता येतात.
मात्र, या समस्यांवर काही घरगुती उपचार नक्कीच करता येतात. उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी सतत पाणी पिणे, सतत तोंड आणि हात-पाय धुणे, बाहेर जाताना स्कार्फ, गॉगल, टोपीचा वापर करणे अशा अनेक उपाय करता येतात. याशिवाय घरातच अशा अनेक गोष्टी असतात. ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. आज आपण या लेखातून सब्जा (Basil Seeds) खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत. (हेही वाचा - Summer Health Tips: उन्हाळ्यात लिंबू सरबत प्यायलाने शरीरास होणारे 'हे' आश्चर्यजनक फायदे तुम्हाला माहित आहे का?)
सब्जा सेवनाचे आरोग्यदायी फायदे -
- मधूमेहींची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
- मूत्र विसर्जन करताना उष्णतेमुळे होणारा त्रास कमी होतो.
- युरिन इनफेक्शन झाल्यास सब्जाचे बी पाण्यातून घेतल्यास त्रास कमी होतो.
- सब्जाच्या सेवनाने जळजळ कमी होते.
- सब्जाचे बीया पाण्यात टाकून प्यायल्याने अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास कमी होतो.
- सब्जामध्ये भरपूर प्रथिने, लोह ,फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे वजन नियंत्रित राहते.
- सब्जा बीया त्वचा आणि केसांवरसाठी परिणामकारक ठरतात.
दरम्यान, सब्जाचे बी हे काळसर रंगाचे असेत. सब्जा पाण्यामध्ये भिजवल्यानंतर त्याला पांढरा रंग येतो. सब्जाचे बी सेवन केल्यास उष्णता कमी होते. सब्जा बीयांमध्ये पोषक अॅंटी ऑक्सिडंट आणि पाचक गुणधर्म असतात. सब्जाचे बी पाण्यात भिजल्यानंतर गोडसर आणि गुळगुळीत लागतात. तुम्ही सरबतामध्ये सब्जा बी टाकून सेवन करू शकता.