Hair Care Tips: केसांच्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यास मदत करेल 'कढीपत्ता'; जाणून घ्या फायदे

जे तुमच्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

Curry Leaves (Photo Credits: Pixabay)

जेवणात प्रत्येक पदार्थात मोहरी, जिरं आणि कढीपत्त्याचा 'चर्रर्रर्र......' असा फोडणीचा आवाज आला आणि घरभर त्याचा वास दरवळला की आपल्याला प्रत्येक पदार्थ पूर्णत्वास गेल्यासारखा वाटतो. मात्र आपल्यापैकी अनेकांना हा कढीपत्ता आपल्या दाताखाली आलेला आवडत नाही किंबहुना तो खायला आवडत नाही. परंतू तुम्हाला माहित आहे का हा कढीपत्ता (Curry Leaves) तुमच्या शरीरासाठी विशेष करुन तुमच्या केसांसाठी किती फायदेशीर आहे. कढीपत्ता हा केवळ फोडणीपुरता महत्त्वाचा नसून याच्या तेलामुळे, लेपामुळे वा कच्चा चावून खाल्लाने तुमच्या शरीरास त्याचे अनेक फायदे होतात.

कढीपत्त्यामध्ये असतात ही पोषकतत्वे:

कढीपत्त्यामध्ये फायबर, कॅल्शिअम, व्हिटॅमिन C,व्हिटॅमिन B,व्हिटॅमिन E असते. जे तुमच्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

कढीपत्त्यांचे केसांना होणारे फायदे:

1. केसांची वाढ

कढीपत्ता तुमच्या केसांची मूळ मजबूत करतात.या शिवाय जर तुमच्या स्काल्पवर घाण साचली असेल तर ती काढून तुमच्या केसांच्या वाढीला चालना देतात.

2. केसगळती

कढीपत्त्यामध्ये असलेले केरेटीन आणि प्रोटीन तुमच्या केसांच्या वाढीसाठी चांगले असते. जर तुम्हाला केसगळतीचा त्रास असेल तर तुमच्यासाठी कढीपत्ता अगदीच योग्य आहे. कढीपत्त्याच्या सेवनामुळे किंवा त्याच्या वापरामुळे तुमचे गेलेले केस परत येऊ शकतात. तुमची केस गळती थांबू शकते.

हेही वाचा- Winter Hair Care Tips: थंडीत केसांमध्ये होणारा कोंडा दूर करण्यासाठी करा हे '5' नैसर्गिक उपाय

3. पांढरे केस काळे करण्यास मदत

आजकाल केस पांढरे होण्याची समस्या खूप कमी वयातच मुलांमध्ये आढळून येते. अशा वेळी कढीपत्ता खूप फायदेशीर ठरतो. कढीपत्यामधील व्हिटॅमिन E तुमच्या केसांचा काळा रंग टिकून राहतो.

4. कोंडा करते दूर

तुमच्या स्काल्पवरील घाण अर्थातच साचलेल्या रुपातील असलेला कोंडा कढीपत्ता काढून टाकते. कढीपत्त्याच्या सेवनामुळे किंवा वापरामुळे तुमच्या केसांसाठी त्रासदायक असलेला कोंडा कमी होतो. कोंडा परत होतही नाही.

5. स्काल्पला करते मॉश्चराईझ

तुमच्या केसांची स्काल्प कोरडी झाली आहे. तिला जर तुम्हाला मॉश्चराईज करायची असेल तर तुम्ही कढीपत्त्याचा वापर करायलाच हवा.

असा हा गुणकारी आणि औषधी कढीपत्ता दाताखाली आल्यास तो काढून न टाकता त्याचे सेवन करा. ज्याचा तुमच्या शरीराला नक्कीच फायदा होईल.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)