Covid-19 Testing: गुळण्या केलेले पाणी हा कोविड-19 चाचणीसाठी एक पर्याय असू शकतो- ICMR
कोरोना व्हायरसची (Coronavirus) चाचणी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या स्वॅब टेस्टिंगसाठी (Swab Testing) गुळण्या केलेले पाणी हा एक पर्याय असू शकतो, असे एका अभ्यासातून समोर आल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (Indian Council of Medical Research) म्हटले आहे. गुळण्या केलेलं पाणी किंवा लाळ यापैकी SARS-CoV-2 च्या चाचणीसाठी काय जास्त उपयुक्त ठरेल हे तपासणे हा या अभ्यासाचा मुख्य उद्देश असा होता. तसंच चाचणीच्या या दोन पद्धतींपैकी कोणती पद्धत रुग्ण पटकन स्वीकारतात हे पाहणे, हा या अभ्यासाचा दुसरा उद्देश होता. (COVID19 Tests In Single Day: भारताने कोविड 19 च्या दैनंदिन चाचण्यांमध्ये आज नवीन उच्चांक; एकाचं दिवसात 9,18,470 चाचण्या)
आयसीएमआरच्या संशोधनकांनी दिल्लीतील AIIMS रुग्णालयातील 50 कोविड-19 रुग्णांवर मे ते जून दरम्यान अशा प्रकराची चाचणी केली. aerosol generation चा धोका हा स्वॅब गोळा करण्या इतकाच आहे किंवा त्याहून जास्त आहे, हे स्पष्ट झाले नाही. असे आयसीएमआरच्या या चाचणीतून दिसून आले. aerosol generation च्या ट्रान्समिशनमधून उत्पन्न होणारा धोका कमीत कमी करण्यासाठी कोविड-19 चाचणी ही पद्धत घरी तपासणी करताना करावी, असे या अभ्यासात म्हटले आहे. ही पद्धत खूप आजारी असलेल्या व्यक्तींसाठी, लहान मुलांसाठी वापरली जावू नये.
ANI Tweet:
गुळण्या केलेले पाणी हे SARS-CoV-2 च्या तपासणीसाठी स्वॅब कलेक्शनपेक्षा अधिक उपयुक्त ठरेल, असे या चाचणीच्या प्राथमिक निष्कर्षातून समोर आले आहे. गुळण्या केलेल्या पाणी संशयित रुग्णांकडून घेणे अधिक सोयीचे ठरेल. तसंच आरोग्य सेवकांच्या दृष्टीने देखील ते कमी धोकादायक असेल. त्याचप्रमाणे स्वॅब कलेक्शनसाठी लागणाऱ्या साधनांची किंवा टेस्टिंग टूलची गरज नसल्याने चाचणीची किंमतही कमी होण्यास मदत होईल.
गुळण्या केलेल्या पाण्याच्या cycle threshold (C ) values या स्वॅब कलेक्शनच्या cycle threshold (C ) values पेक्षा अधिक होत्या. स्वॅब कलेक्शन घेतलेल्या रुग्णांपैकी 72 टक्के रुग्णांना स्वॅब घेतल्यानंतर अस्वस्थता जाणवली. तर गुळण्या केलेल्या रुग्णांपैकी केवळ 24 टक्के रुग्णांना अस्वस्थ वाटले.
आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, स्वॅब कलेक्शनमध्ये खूप त्रुटी असून आरोग्य कर्मचाऱ्यांना त्याचे ट्रेनिंग द्यावे लागते. त्याचप्रमाणे स्वॅब कलेक्शनमुळे आरोग्य सेवकांची सुरक्षितता धोक्यात येते.