ब्राझीलमध्ये मृत महिलेच्या गर्भाशय दानातून गोंडस चिमुकलीचा जन्म, वैद्यकीय इतिहासातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

ब्राझीलच्या रुग्णालयात १० तासाहून अधिक काळ गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली.

ब्राझीलमध्ये मृत महिलेने दान केलेल्या गर्भाशय प्रत्यारोपणातून बाळाचा जन्म । प्रतीकात्मक फोटो । | (Photo Credit: Pixabay)

World’s First Baby Born via Womb Transplant From a Dead Donor : समाजात अवयवदानाविषयी पुरेशी सजगता नसल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. मात्र ब्राझीलमध्ये मृत महिलेच्या गर्भाशय दानाच्या (Womb Transplant ) पुढाकाराने एका चिमुकलीने जन्म घेतल्याची घटना समोर आली आहे. वैद्यकीय शास्त्रामध्ये अशाप्रकारे मृत महिलेकडून दान करण्यात आलेल्या गर्भाशयातून यशस्वी प्रसूती होण्याची ही पहिलीच घटना आहे. वंध्यत्वाशी सामना करणाऱ्या अनेक स्त्रियांचं आई होण्याचं स्वप्न अधुरं राहतं. मात्र ब्राझीलच्या डॉक्टरांच्या या यशस्वी प्रयत्नामुळे अनेकींना आशेचा नवा किरण मिळाला आहे. The Lancet Medical Journal मध्ये याविषयीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. पुण्याच्या गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये गर्भाशय प्रत्यारोपणाचा प्रयत्न यशस्वी, चिमुकलीचा जन्म, आशियातील पहिली यशस्वी प्रसुती

गर्भाशय प्रत्यारोपणामध्ये दाता असणाऱ्या स्त्रीकडून ज्या महिलेच्या शरीरात गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आले त्या महिलेच्या शरीरात arteries, ligaments, vaginal canals आणि veins जोडल्याची माहिती देण्यात आली आहे. ब्राझीलमध्ये गर्भाशय प्रत्यारोपणानंतर जन्माला आलेली चिमुकली सुदृढ आहे. वैद्यकीय तपासणीमध्ये जन्माच्या वेळेस बाळाचं वजन 2,550 grams असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. गर्भाशयात 35 आठवडे आणि तीन दिवस गर्भ राहिल्यानंतर सिझेरियन पद्धतीने ही प्रसूती करण्यात आली. अवयव दानाबाबतचे हे '5' समज -गैरसमज  दूर करा

जगभरात गर्भाशय दानातून गर्भ निर्माण करून टिकवण्याचे विविध प्रयत्न करण्यात आले होते. अमेरिका, टर्की देशात 10 वेळेस मृत महिलेचं अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यापूर्वी अपयशी ठरली आहे. Sao Paulo University च्या ब्राझिलियन डॉक्टर Dani Ejzenberg यांनी हे संशोधन केले.

ब्राझीमध्ये ३२ वर्षीय महिलेवर गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. जन्मतः या महिलेच्या शरीरात गर्भाशय नव्हते. स्ट्रोकमुळे मृत पावलेल्या एका ४५ वर्षीय महिलेने तिचे गर्भाशय दान केले . ब्राझीलच्या रुग्णालयात १० तासाहून अधिक काळ गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. शास्त्र क्रियेनंतर पाच महिने ही महिला सतत डॉक्टरांच्या निगराणीखाली होती. नवीन गर्भाशय शरीराने स्वीकारल्याची खात्री झाल्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली प्रत्यारोपित केलेल्या गर्भाशयातून एका गोंडस मुलीचा जन्म झाला.