Fact Check: आयुष मंत्रालयाने सूचवलेले होमिओपॅथी औषध Arsenicum Album 30 ठरते Coronavirus उपचारांसाठी प्रभावी? WHO काय म्हणतंय?
मात्र, कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्या माहितीची सत्यता तपासून पाहणे गरजेचे आहे.
कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक कामाला लागले आहे. अद्यापही या रोगावर नियंत्रण मिळवणारा ठोस उपाय गवसला नाही. दरम्यान, आयुष मंत्रालय ( AYUSH Ministry of India) द्वारा कोरोना व्हायरसबाबत 29 जानेवारी 2020 या दिवशी एक माहिती प्रसारीत करण्यात आली होती. आयुष मंत्रालयाने ट्विट करत एक लिंक शेअर केली होती. या लिंकमध्ये म्हटले होते की, सेंट्रल काउंसिल फॉर रिसर्च इन होम्योपैथी (CCRH) ने आपल्या वैज्ञानिक सल्लागार बोर्डाच्या 64 व्या बैठकीत कोरोनावायरस संक्रमापासून बचाव करण्याच्या पद्धती आणि उपायांवर चर्चा केली. अभ्यासकांनी या बैठकीत शिफारस केली की, होमिओपॅथी औषध आर्सेनिकम एल्बम 30 (Homoeopathy Medicine Arsenicum Album30) हे कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी उपचार म्हणून वापरण्यात येऊ शकते. जे आयएलआय (ILI) नियमत्रणात आणण्यासाठीही सूचविण्यात आले आहे. यात आर्सेनिकम अल्बम 30 च्या एका डोसची शिफारस करण्यात आली आहे. जो प्रतिदिन अनुशापोटी तीन दिवस घेतले जातो.
आयुष मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करत म्हटले होते की, या औषधाची मात्र एक महिनाभर घ्यायला हवी. ज्यामुळे जगभरात डोकेदुखी ठरलेल्या कोरोना व्हायरस संक्रमणावर मर्यादा आणता येऊ शकतात. याशिवाय अभ्यासकांनी असाही सल्ला दिला की, या रोगावर नियंक्षत्रण मिळविण्यासाठी भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सूचवलेल्या उपायांचे त्वरीत पालन करणे गरजेचे आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसने आतापर्यंत विविध देशांतील सुमारे 492 नागरिकांचा बळी घेतला आहे. जगभरातील विविध 20 देशांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून, तब्बल 24,000 लोकांना या रोगाची लागण झाल्याचा आकडा प्रसारमाध्यमांनी दिला आहे.
पीआयबी ट्विट
कोरोना व्हायरसच्या औषधांबाबत जागतीक आरोग्य संघटना (World Health Organisation) अर्थातच डब्लूएचओ (WHO) ने स्पष्टपणे म्हटले आहे की, आतापर्यंत तरी कोरोना व्हायरस आटोक्यात आणणारे औषध अथवा लस उपलब्ध झाली नाही. जगभरातील संशोधक त्यावर काम करत आहेत. दरम्यान, आयुष मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात कोरोना व्हायरससारख्या व्हायरल आजारांबाबत आयुष मंत्रालयाने जारी केलेली माहिती ही प्राथमिक आणि संरक्षणात्मक तसेच प्रतिबंधक उपायांच्या संदर्भात आहे. 29 जानेवारी 2020 या दिवशी या पत्रकाबाबत सल्ला देण्यात आला होता की, हे उपाय कोरोना व्हायरसवर उपचाराबात दावा करत नाहीत. तसेच, या आजारासंबंधी आम्ही कुठलेही औषध सूचवल्याचा दावा करत नाही. (हेही वाचा, Coronavirus: आतापर्यंत 492 जणांचा मृत्यू, भारतातही कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढला)
दरम्यान, प्रसारमाध्यम आणि सोशल मीडियातून काही ठिकाणी आयुष मंत्रालयाच्या नावे कोरोना व्हायरस उपचाराबाबत दिशाभूल करणारे काही संदेश, वृत्त प्रसिद्ध झाल्याचे पुढे आले आहे. मात्र, कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्या माहितीची सत्यता तपासून पाहणे गरजेचे आहे. बातम्यांची सत्यता पडताळणाऱ्या AltNews आणि र BoomLive या वेबसाइट्सनी म्हटले आहे की, होमिओपॅथीचे डॉक्टर आणि अभ्यासकांनी असे म्हटले आहे की, आतापर्यंत तरी कोरोना व्हायरसवर उपचार करणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही. त्यामुळे होमिओपॅथी औषधांनी कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवात येते हे वृत्त निराधार आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतेही औषध मिळाल्याचे म्हटले नाही. त्यामुळे कोरोना व्हायरसवर उपचार करणाऱ्या औषधाबद्दल प्रसारीत झालेली वृत्तं निराधार आणि असत्य आहेत.