'टू फिंगर व्हर्जिनिटी टेस्ट' शिक्षण वैद्यकीय अभ्यासक्रमातून वगळण्यात यावे

प्रोफेसर खांडेकर यांनी मेडिकल काऊन्सील ऑफ इंडिया (Medical Council of India) यांच्याकडे याबाबतचा एक अहवाल पाठवला आहे

Two Finger Virginity test | (Archived and representative images)

'टू फिंगर व्हर्जिनिटी टेस्ट' (two-finger virginity test) म्हणजेच कौमार्य चाचणी ही पूर्णपणे अवैज्ञानिक असल्याचे जगभरातील तज्ज्ञांनी मान्य केले आहे. भारतात सर्वोच्च न्यायालयानेही या चाचणीवर बंदी घातली आहे. या चाचणीबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमातून शिक्षण देण्यात काहीच अर्थ नाही. वैद्यकीय अभ्यासक्रमांतून या चाचणीबाबत विद्यार्थ्यांना शिक्षण देणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे. त्यामुळे अशा प्रकारची चाचणी आणि शिक्षण वैद्यकीय अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी फॉरेन्सिक मेडिसीन प्रोफेसर (Forensic Medicine Professor) इंद्रजीत खांडेकर (Dr Indrajit Khandekar) यांनी केली आहे. प्रोफेसर खांडेकर यांनी मेडिकल काऊन्सील ऑफ इंडिया (Medical Council of India) यांच्याकडे याबाबतचा एक अहवाल पाठवला आहे. हा अहवाल सुमारे 30 एमबीबीएस आणि पोस्ट ग्रॅज्यूएट फॉरेन्सीक मेडिसिन टेक्सबुक अभ्यासावर आदारीत आहे. खांडेकर यांनी 26 डिसेंबर रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला याबाबत एक पत्रही पाठवले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात खांडेकर यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारची चाचणी करताना पीडित महिलांना अत्यांत वाईट पद्धतीने मानसिक त्रासातून जावे लागते. एखाद्या पीडितेसोबत बलात्कारासारारखे वाईट कृत्य घडले आहे किंवा नाही याबात डॉक्टर तिची टू फिंगर टेस्ट सरतात. या टेस्टमुळे अनेक महिलांना अत्यंत लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. या चाचणीबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमात शिक्षण दिले जाते. अनेक प्रकरणांमध्ये काही न्यायालयांनीही पोलिसांना पीडितेची अशा प्रकारची चाचणी करण्याबात सांगितले होते.

वैद्यकीय अभ्यासक्रमात अनेक पुस्तके ही महिलांच्या कौमार्य चाचणी करण्याबाबत सांगतात. पण, पुरुषांच्या कौमार्य चाचणीबाबत एखाद्या पुस्तकातून क्वचितच भाष्य करण्यात आले असेल. ही चाचणी पूर्णपणे अवैज्ञानिक आहे. सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे प्रोफेसर खांडेकर सांगतात की, अनेक संशोधनांमधून हे पुढे आले आहे की, महिलांच्या जननेंद्रियात असलेल्या हायमनचा शोध घेणे हे कठीण आहे. या चाचणीद्वारे तिने शारीरिक संबंध ठेवले आहेत किंवा नाही हे या चाचणीतून समजू शकत नाही. तसेच, अनेकदा कोणत्याही प्रकारे शरीरसंबंध ठेवले नसतानाही हायमन (जननेंद्रियातील पडदा) फाटू शकतो, असे कित्येक प्रकरणात पुढे आले आहे. त्यामुळे अशा चाचणीबाबतचे शिक्षण वैद्यकीय अभ्यासक्रमातून वगळण्यात यावे, अशी मागणी खांडेकर यांनी केली आहे. (हेही वाचा, 'विकी डोनर्स' सावधान! आता स्पर्म डोनेट केल्यास तुमची ओळख लपून राहणार नाही)

विशेष असे की, अशा प्रकारची टेस्ट करण्यावर सर्वोच्च न्यायालयानेही बंदी घातली आहे. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमांतूनही परिवर्तन करत हे शिक्षण वगळण्यात यायाला हवे अशी मागणी होत आहे.