Health Benefits Of Walnuts: अक्रोड खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

अक्रोडदेखील सुकामेव्याचाच एक प्रकार आहे. सामान्यतः अक्रोड सुकामेव्यात मिसळून खाल्ले जाते. अक्रोडाचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. केक, चॉकलेट, कुकीज, लाडू, मसाले दूध, आईस्क्रिममध्ये अक्रोडचा वापर केला जातो. अक्रोड खाल्ल्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत राहते. अक्रोडाचे तेल त्वचा आणि केसांचे सौदर्य वाढविण्यासाठी महत्त्वाचे ठरते. अक्रोडाच्या कच्चा फळापासून मुंरबा, चटणी, सरबत तयार केले जाते. अक्रोडाचे नियमित सेवन केल्यामुळे आपलं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. आज आपण या लेखामधून अक्रोड खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात...

Health Benefits Of Walnuts (PC - Pixabay)

Health Benefits Of Walnuts: अनेकजण निरोगी राहण्यासाठी दररोज सुकामेव्याचं सेवन करतात. अक्रोडदेखील (Walnuts) सुकामेव्याचाच एक प्रकार आहे. सामान्यतः अक्रोड सुकामेव्यात मिसळून खाल्ले जाते. अक्रोडाचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. केक, चॉकलेट, कुकीज, लाडू, मसाले दूध, आईस्क्रिममध्ये अक्रोडचा वापर केला जातो. अक्रोड खाल्ल्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत राहते. अक्रोडाचे तेल त्वचा आणि केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी महत्त्वाचे ठरते.

अक्रोडाच्या कच्चा फळापासून मुंरबा, चटणी, सरबत तयार केले जाते. अक्रोडाचे नियमित सेवन केल्यामुळे आपलं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. आज आपण या लेखामधून अक्रोड खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात...(हेही वाचा - 'ब्रॉकली' खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या)

वजन नियंत्रित राहण्यास मदत -

अक्रोडाचे दररोज सेवन केल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. तुम्हालाही तुमचं वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर दररोज 4 ते 5 अक्रोडाचे सेवन करा.

कॅन्सरचा धोका कमी होतो -

अक्रोडमधील अँटि ऑक्सिडंट घटकांमुळे कॅन्सरच्या रोगापासून सुटका होते. दररोज सकाळी सुकामेव्यामध्ये अक्रोडाचे सेवन करा. त्यामुळे तुम्हाला भविष्यात कॅन्सरचा धोका उद्भवणार नाही.

ह्रदयविकारापासून रहाल दूर -

अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे ह्रदयाचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. अक्रोड खाण्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. अक्रोडमुळे तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत नाही. त्यामुळे तुम्ही ह्रदयविकारापासून दूर राहता.

मेंदूचे कार्य सुरळीत राहण्यास मदत -

अक्रोडाचे सेवन केल्याने तुमच्या मेंदूचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते. तसेच तुमची स्मरणशक्तीही वाढते आणि तुम्हाला फ्रेश वाटू लागते. त्यामुळे दररोज अक्रोडाचे सेवन करा.

शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत -

अक्रोड खाल्ल्यामुळे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते. पुरुषांमध्ये असलेल्या वंधत्वावर मात करण्यासाठी दररोज अक्रोडाचं सेवन करणं महत्त्वाचं ठरतं.

केस आणि त्वचेसाठी गुणकारी -

अक्रोडामध्ये व्हिटॅमिन 'ई' आणि प्रोटिन्स हे घटक भरपूर प्रमाण असतात. त्यामुळे तुमच्या केसांचे आणि त्वचेचे सौंदर्य वाढण्यास मदत होते. तुम्हालाही तुमच्या चेहऱ्याचे आणि केसांचे सौंदर्य वाढवायचे असेल तर आठवड्यातून एकदा हा पर्याय नक्की आजमावून पहा.

अक्रोड या फळाचे ज्याप्रमाणे फायदे आहेत. त्याचप्रमाणे अक्रोडाच्या पानाचेही गुणकारी फायदे आहेत. तुमच्या त्वचेवर जळजळ, वेदना किंवा सूज येत असेल तर त्यावर अक्रोडाच्या पानांचा लेप लावा. असं केल्यास तुम्हाला लवकर आराम मिळेल. वरील सर्व आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अक्रोडाचे सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे दररोज मूठभर अक्रोडाचे सेवन नक्की करा आणि आजारांपासून दूर रहा.